राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी (Market Committee Election) आज मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. आज राज्यातील 147 बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राजकीय पक्षांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. अनेक बडे नेते यासाठी प्रयत्नशील आहेत.
सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळालं. कुठे बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे तर कुठे निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा समना होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती उतरल्या, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारांची पळवापळव देखील बघायला मिळाली. बाजार समित्यांसाठी आज (28 एप्रिल) मतदान होणार आहे. तर 30 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे हे आपल्याला 30 एप्रिललाचं समजणार आहे.
आता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणार कृषी अभ्यासक्रम
स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप अशी लढती होणार आहेत. तर काही ठिकाणी काही पक्ष स्वतंत्र ताकद अजमावत असल्याचे सध्याचे चित्र आहे. यामुळे कोणाची ताकद किती आहे. हे आता लवकरच समजेल.
शेतकऱ्यांनो उष्माघात कसा टाळायचा, वाचा सविस्तर, अनेकांनी गमावलेत जीव
बावऱ्या बैलासमोर गौतमी पाटीलचा डान्स, कार्यक्रमाला एकाही व्यक्तीची उपस्थिती नाही...
हा आहे भारतातील सर्वात महाग ट्रॅक्टर, जाणून घ्या त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये
Share your comments