फक्त दिल्लीच नाही तर उत्तर भारतातील जवळपास सर्वच राज्यात धुकेची स्थिती आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की आज सूर्यप्रकाश असेल पण शीतलहरी कायम राहील. त्याच धुक्याचा परिणाम रेल गाड्यांच्या हालचालीवर होत आहे, आज 13 रेल गाड्यांची वेळ यामुळे बदलण्यात आले आहेत .
हवामान खात्याने 24 जानेवारी दरम्यान देशाच्या वायव्य राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता दर्शविली आहे आहे. हवामान विभाग (आयएमडी) च्या म्हणण्यानुसार खोऱ्यात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. काल खोऱ्यात किमान तापमान शून्य डिग्रीच्या खाली कित्येक अंशांनी खाली गेले. त्यानंतर 24 जानेवारी रोजी हलकी ते मध्यम हिमवर्षाव आणि पाऊस होईल. श्रीनगरमध्ये किमान तापमान -7.4 डिग्री, कुपवाडा -6.7 डिग्री, कोकरनाग -10.3 डिग्री आणि गुलमर्ग -7.0 अंश नोंदले गेले.
उत्तरेत पुढील दोन दिवस थंडीने त्रस्त असलेले लोकांना आणखी तीव्र थंडीचा सामना करावा लागेल , कारण हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील दोन-तीन दिवस थंडी असेल. आज सकाळी दाट धुक्यामुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत दृश्यमानता कमी झाली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दिल्लीत तापमान 6.8 डिग्री सेल्सियस आहे. काल झालेल्या उन्हात थंडीमुळे लोकांना दिलासा मिळाला असला तरी थंडीची लाट कायम आहे.
तर स्कायमेटच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांत उत्तर भारतातील हवामान कोरडे राहील. उत्तर भारताला थंडीचा सामना करावा लागू शकतो,महाराष्ट्रातील काही जिल्हात बोचरी थंडी पाडण्याचे संकेत.
Share your comments