डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालय अकोला हे महाविद्यालय प्रत्येक विशेष दिन हा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत असते. त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन्ही ही आनंदाने आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने समाजाला नवीन शिकवण देत असते. त्याचप्रमाणे आज सुद्धा कृषी महाविद्यालय अकोला येथे जागतिक सायकल दिन हा साजरा करण्यात आला.
दैनंदिन जीवनात सायकलिंगचा वापर लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने
३ जून हा दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केल्या जात असतो.सायकल चालविणे केवळ शारिरिक आरोग्यासाठीच चांगले आहे असे नाही तर ते पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठीही चांगले आहे.यासंबधीची सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणिवजागृती व्हावी यासाठी कृषी महाविद्यालय,अकोला येथे सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी डॉ. एस एस माने (सहयोगी अधिष्ठाता कृ. म. अकोला ) यांनी रॅली ला हिरवी झेंडी दाखवून रॅली ला सुरवात केली.
तसेच कार्यक्रमाला प्रा. लांबे सर, डॉ गिते सर , डॉ दिवेकर सर,प्रा. सानप मॅडम, डॉ कोकाटे सर, प्रा. काहाते सर, प्रा.शेळके सर ,प्रा.तोटावर सर, प्रा. दलाल सर,डॉ जेउघले सर , डॉ. खाडे सर, प्रा.जोशी सर.यांची उपस्थिती लाभली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यानी उस्फुर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर्स व घोषणा यांच्या माध्यमातून लोकांमध्ये सायकल चालवण्याबद्दल जनजागृती केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. खाडे सर आणि स्वयंसेवक स्वस्तिक प्रधान,
कन्हैया गावंडे ,योगेश उगले,आदित्य शिंदे, विशाल काळे, करिश्मा रजुभाई, चेतन आगडते अक्षय माकणे साक्षी गौलकर ,वैभव आढाऊ ,मनाली धवसे , हिमांशू डोंगरे,तुषार काळे ,भगवत गायकवाड, सेजल वालशिंगे, आयुषी झोडे ,आदिती हिगणकर सूरज जाधव,श्वेता इंगळे , यांनी परिश्रम घेतले ,तुषार काळे ,भगवत गायकवाड, सेजल वालशिंगे, आयुषी झोडे ,आदिती हिगणकर सूरज जाधव,श्वेता इंगळे , यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments