यंदा पावसाने चांगलीच दांडी मारल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अनेकांची शेतीची कामे रखडली आहेत. कमी पावसामुळे धरण देखील भरली नाहीत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे.
यामुळे धरण पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. दरम्यान मागच्या चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात ०.५४ टीएमसीने तर पाणी पातळीत १.२ फुटाने वाढ झाली आहे. सध्या धरणात एकूण उपलब्ध पाणीसाठा २२.८९ तर त्यापैकी उपयुक्त १७.८९ पाणीसाठा टीएमसी इतका आहे.
याठिकाणी सध्या पावसाचा जोर ओसरल्याने धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी ६,२३८ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याची माहिती धरण विभागाकडून देण्यात आली. कोयना चौथ्या टप्प्यामार्फत तयार होणारी वीजनिर्मिती अद्याप बंद आहे.
साखरेचे भाव वाढण्याचा अंदाज, कारण..
जलपातळी ६३० मीटरच्या वर गेल्यानंतर चौथ्या टप्प्यातून वीजनिर्मिती पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे आता कधी पाऊस पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात मोठा दुष्काळ पडणार? मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस
राज्यातील हे एक महत्वाचे धरण आहे. यामध्ये मोठा पाणीसाठा असतो. पाटण, महाबळेश्वर, कोयना, नवजा या भागात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे किंचीत का होईना पाणी पातळीत वाढ होत आहे.
तुमच्या बागेत ही पाच झाडे लावा, तुमच्या घराची हवा पूर्णपणे करतील स्वच्छ
३५ हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक अटकेत, 6 लाखांचे बिल काढण्यासाठी केली होती पैशांची मागणी...
कोंबड्या आणि शेळीसाठीही कर्ज मिळणार, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
Share your comments