गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. गेल्या तीन दशकांतील म्हणजेच डिसेंबर 1991 नंतरचा सध्याचा सर्वाधिक महागाई दर आहे. भाज्यांचे दर 8 पटीने वाढले आहेत. डिसेंबरमध्ये मासे, मटण आणि अंड्यांचा महागाई दर 6.68 टक्के राहिला. नोव्हेंबरमध्ये त्याचा दर 9.66% एवढा होता, अर्थात यामध्ये घट नोंदवली गेली आहे. यामुळे आता केंद्र सरकारने काही निर्णय घेत दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
डिसेंबर 2021 मध्ये महागाईचा दर मुख्यत्वे कापड, कागद आणि त्यातील उत्पादनांसह तेल, धातू, कच्चे तेल, रासायनिक आणि खाद्य उत्पादनांमुळे वाढला आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत नोव्हेंबरच्या तुलनेत या काळात कांद्याचे भाव कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. पेट्रोल आणि डिझलचे दर देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे याचा थेट परिणाम सर्वच गोष्टींवर होत आहे. अन्नधान्य महागाई वाढली आहे. त्याचे भाव 6.70% वरून 9.24% पर्यंत वाढले आहे. गेल्या वर्षी एप्रिलपासून घाऊक महागाई सातत्याने 10 टक्क्यांच्या वर आहे.
नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 14.23% वर दर पोहोचला होता. किरकोळ महागाईमुळेही लोक चिंतेत आहेत. त्याची आकडेवारी बुधवारीच जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता मोठे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. जर घाऊक महागाईचा दर असाच वाढत राहिला तर किरकोळ महागाई देखील वाढेल. दोन्ही महागाई दर भिन्न असले तरीही एकमेकांशी संबंधित आहेत. यामुळे याबाबत विचार करणे गरजेचे आहे. नाहीतर सरकारच्या अडचणीत देखील वाढ होणार आहे.
असे असताना त्यांचा प्रभाव केवळ तुमच्या स्वयंपाकघर आणि खिशावरच पडत नाही, तर तुमची बँक शिल्लक, गुंतवणूक आणि आर्थिक योजनांवरही महागाई दराचा परिणाम होतो. किरकोळ महागाई तुमचा मोबाईल, प्रवासासाठी शाळेची फी, मनोरंजन, घरभाडे आणि वैद्यकीय खर्च यांचाही मागोवा घेते. यामध्ये देखील वाढ होत आहे. यामुळे केंद्र सरकारने यात लक्ष घालणे गरजेचे आहे. यामुळे पुढील काळात ही महागाई कमी होणार की अजूनच वाढणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावर सरकारचे देखील पुढील राजकीय गणित अवलंबून आहे.
Share your comments