1. बातम्या

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अगतिकता! जगावे की मरावे हाच मोठा प्रश्न, सरकारला येईल का वेळीच जाग?

सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. परंतु शेतकरी राजा या उन्हाच्या झळाना अजिबात कवडीची किंमत देत नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
vegetable market rate decrease

vegetable market rate decrease

सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाचा चटका  मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. परंतु शेतकरी राजा या उन्हाच्या झळाना अजिबात कवडीची किंमत देत नाही.

परंतु एवढ्या उन्हामध्ये मोठ्या कष्टाने पिकवलेल्या भाजीपाला जेव्हा रस्त्यावर फेकायची वेळ येते  तेव्हा मात्र ही झळ शेतकऱ्याला नक्कीच त्रासदायक आणि मानसिक वेदना देणारे ठरते. अशीच काहीशी परिस्थिती सध्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. जर आपण साधारणपणे पाहिले तर जानेवारी ते मार्च हा महिना भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसा घातक असतो. कारण प्रत्येक वर्षी या कालावधीमध्ये दरात घसरण ठरलेलीच असते. अशीच परिस्थिती सध्या आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने रक्ताचे पाणी करून पिकवलेला टोमॅटो अक्षरशः दहा रुपये किलो विकायची पाळी आली आहे. इतकेच नाही तर कोथिंबीर, कारली आणि वांग्याची देखील हीच परिस्थिती आहे. यावर्षी भाजीपाला उत्पादनाचा विचार केला तर जशी जशी उन्हाळ्याची सुरुवात होते तशी तशी भाजीपाल्याची आवक कमी होते आणि जून महिना आला की भाव गगनाला पोहोचतात.

नक्की वाचा:गाई – म्हशीच्या गर्भधारणेसाठी ऑक्टोबर ते मार्चचा काळ असतो उत्

परंतु या वर्षी जानेवारीत जो पाऊस झाला त्यामुळे भाजीपाला स्वस्त झालाच नाही. परंतु यामुळे भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने  आवक प्रचंड वाढली व फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून जसजशी दरात घसरण होत गेलीअद्याप पर्यंत तसेच  आहे.

ठीक आहे यामध्ये ग्राहकांना तर आनंद झाला परंतु ज्या बळीराजाने दिवस-रात्र कष्ट उपसून भाजीपाला पिकवला त्याच्या नशिबी मात्र जे कायमचं वाढून ठेवलेल आहे तेच आले.

 शेतकऱ्यांचा अक्षरशः वाहतूक खर्च देखील निघणे मुश्किल

 अगोदरच डिझेलचे भाव गगनाला स्पर्श करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला माल मार्केटमध्ये नेण्यासाठी जे वाहन न्यावे लागते त्यांच्या देखील भाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीआहे.परंतु या भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ बाजारात पेक्षा खूपच कमी दर मिळत असल्यानेआम्ही एवढेच नाही तर त्यामधून हमाली, तोलाई आणि त्यांचे कमिशन जाऊन शेतकऱ्याच्या हातात फक्त वीस टक्केच रक्कम उरते.

नक्की वाचा:दूध खरेदीदरातील तीन रूपयांची दरवाढ नुसता फार्स! दूध उत्पादकांची लूट सुरूच

त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की एवढ्या कष्टाने पिकवलेल्या  भाजीपाला शेतात राहू द्यावा, विकावा की फेकावा हेच समजत नाही. सरकारचे धोरण देखील याविरुद्ध चआहे.भाजीपाला हा किमान हमी भावाच्या कक्षाच्या बाहेर आहे. 

व्यापारी ठरवतील त्या दराने शेतकऱ्यांना माल विकण्याशिवाय पर्याय उरत नाही.त्यामुळे आहे त्या भावात शेतकऱ्यांना माल विकण्याशिवाय पर्याय नसल्याने नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे भाजीपाला किमान दराच्या आत विकू नये अथवा विकत घेऊ नये अशी व्यवस्था तरी सरकारने करायला हवी. म्हणजेशेतकऱ्यांच्या जीवनात मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मालाला विकून दोन पैसे येतील व तो आनंदाने जीवन जगू शकेल.

English Summary: vegetable market rate so decrease so farmer so anxiety and worried Published on: 24 March 2022, 01:12 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters