1. बातम्या

Vegetable Market: पाऊस आला भाजीपाल्याचे नुकसान करून गेला,भाजीपाल्याचे दर कडाडले

जुलै महिन्यात जो काही पाऊस झाला, या पावसाने इतर पिकांसोबत भाजीपाला आणि फळपिकांच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले. राज्यात जो काही पाऊस पडला त्यामुळे भाजीपाला पिके जागेवर खराब झाल्यामुळे भाजीपाला आणि फळपिकांच्या आवकमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
market rate of vegetable

market rate of vegetable

जुलै महिन्यात जो काही पाऊस झाला, या पावसाने इतर पिकांसोबत भाजीपाला आणि फळपिकांच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले. राज्यात जो काही पाऊस पडला त्यामुळे भाजीपाला पिके जागेवर खराब झाल्यामुळे भाजीपाला आणि फळपिकांच्या आवकमध्ये  घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

या सगळ्या परिस्थितीमुळे अनेक फळभाज्यानी शंभरचा टप्पा ओलांडला असून पालेभाज्या देखील पंचवीस ते तीस रुपये गड्डी याप्रमाणे विकली जात आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये भाजीपाला आवक अगदी अत्यल्प प्रमाणात होत असून त्यामुळे दर वधारले आहेत.

नक्की वाचा:शेतीचा खेळखंडोबा! जूनमध्ये दुष्काळ, जुलै-ऑगस्टमध्ये अतिवृष्टी, शेतकरी उघड्यावर; नुकसान भरपाईची मागणी

तसेच जो काही बाजारपेठेत भाजीपाला येत आहे त्याचा दर्जा देखील पावसामुळे घसरला असून 30 ते 40 टक्के भाज्या खराब झालेले आहेत. जर आपण यामध्ये भेंडी, शेवगा, गवार आणि मटार सारख्या फळभाज्यांचा बाजारभावाचा विचार केला तर किरकोळ बाजारामध्ये भाव शंभरी पार झाले आहेत. 

त्यासोबतच हिरवी मिरची, सिमला मिरची, वांगी, दोडके या सारख्या भाजीपाल्याचा दर प्रतिकिलो 80 रूपयेपेक्षा अधिक आहे.

नक्की वाचा:काय म्हणता! सिमला मिरचीच्या लागवडीसाठी 'हे' राज्य सरकार देते चक्क इतके अनुदान, वाचा महत्त्वाची माहिती

 पालक, कोथिंबीर, मेथी आणि कांदा पात तसेच अंबाडी आणि चाकवत यासारख्या पालेभाज्यांची एक जुडी पंचवीस ते तीस रुपयांच्या दरम्यान आहे.अजूनही बऱ्याच भागांमध्ये पावसाचा जोर असून पुणे जिल्ह्यातील बऱ्याच भागांमध्ये पाऊस सुरू असून त्या ठिकाणी पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

पुणे शहराला बारामती व सासवड सारख्या भागातून पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होते परंतु या ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे पालेभाज्या खराब झाले असून फळभाज्यांच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचा परिणाम हा संबंधित भाजीपाला व फळ भाज्यांची आवक घटण्यावर झाला आहे.

नक्की वाचा:Floriculture: गुलाब लागवडीत जर 'अशा' पद्धतीने घेतली काळजी तर नक्कीच मिळेल भरघोस नफा आर्थिक उत्पन्न

English Summary: vegetable and fruit rate growth in market due to haivy rain Published on: 12 August 2022, 02:10 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters