MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

अंबाजोगाई येथील सिताफळ संशोधन केंद्रात सिताफळाची कलमे विक्रीकरिता उपलब्‍ध

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या अंबाजोगाई येथील सिताफळ संशोधन केंद्राने वतीने कुलगुरु डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिताफळाच्या विविध वाणाचे दर्जेदार कलम व रोपे तयार करण्‍यात आली असुन शेतकऱ्यांकरिता विक्री करिता उपलब्ध आहे, अशी माहिती सिताफळ संशोधन केंद्र प्रमुख डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


परभणी:
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या अंबाजोगाई येथील सिताफळ संशोधन केंद्राने वतीने कुलगुरु डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिताफळाच्या विविध वाणाचे दर्जेदार कलम व रोपे तयार करण्‍यात आली असुन शेतकऱ्यांकरिता विक्री करिता उपलब्ध आहे, अशी माहिती सिताफळ संशोधन केंद्र प्रमुख डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली.

संशोधन केंद्रात सिताफळाच्‍या सुधारीत वाण धारुर-६ ची वीस हजार कलमे तसेच बालानगरी वाणाची तीस हजार कलमे, तसेच टिपी-७ ची दोन हजार कलमे, आर्का साहनाची दिड हजार कलमे रामफळाची एक हजार कलमे, हनुमान फळाची एक हजार कलमे विक्रिसाठी उपलब्‍ध असुन कलमाचा दर प्रती कलम रु. ४०/- प्रमाणे आहे, तसेच साधी बालानगरीचे सत्‍तर हजार रोपे दर रु. २५/- प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

सदरिल संशोधन केंद्राने निर्मीत केलेल्या विविध वाणांची लागवड खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात मोठया प्रमाणात झाली असुन तामिळनाडु व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांमध्‍येही मोठया प्रमाणात रोपांची मागणी होते. सिताफळातील विविध वाणातील धारुर-६ या वाणास मोठी मागणी असुन याचे वैशिष्टय म्हणजे फळाचा आकार मोठा असुन वजन ४०० ग्राम पेक्षा जास्त आहे तर साखरेचे प्रमाणे १८ टक्के व घनदृव्याचे प्रमाण २४ टक्के असल्यामूळे प्रक्रीया उद्योगामध्ये याची मागणी मोठी आहे. तसेच प्रक्रिया उद्योगात बालानगर या फळांचीही मागणी असते.

सिताफळाच्या गराचा मिल्कशेक, रबडी, आईसक्रीममध्ये मोठ्या प्रमाणात वापर होत असुन गराची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली असून सिताफळ लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. रोपांसाठी डॉ. गोविंद मुंडे यांच्‍याशी संपर्क करावा, मोबाईल क्रमांक ८२७५०७२७९२.

English Summary: Various varieties of custard apple are available for sale at the Custard apple Research Center at Ambajogai Published on: 19 June 2020, 07:25 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters