पंतप्रधान किसान योजना आणि जनधन योजनेंतर्गतातील खात्याधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या देशात लॉकडाऊन चालू आहे, सरकारने केलेल्या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा विचार करत उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी तेथील सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. बँकेत पैसे काढण्यासाठी या योजनेचे लाभार्थी गेल्यानंतर त्यांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असते. या समस्येतून येथील पोस्ट कार्यालयाने नागरिकांची सुटका केली आहे. कारण पोस्ट कार्यलयामुळे नागरिकांना पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज राहिलेली नाही. पीएम किसान योजना आणि जनधन खातेधारकांना आता घरीच पैसे मिळणार आहेत.
सध्या कोरोनामुळे देशात लॉकडाऊन चालू आहे, यात गरीब जनतेला त्रास होऊ नये यासाठी सरकारने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकले आहेत. बँकेत पैसे आल्यानंतर लाभार्थ्यांनी बँकेत गर्दी केली. यामुळे बऱ्याच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासले गेले. यामुळे पोस्ट ऑफिसने एक उपक्रम हाती घेतला आहे. ज्या लाभार्थ्यांचे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत जनधन खाते आणि पीएम किसान योजनेचे खाते आहेत. त्यांना पोस्ट कार्यालय घर पोच पैसे देणार आहे. ही सुविधा खासकरुन उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील लोकांना दिली जात आहे.
तेथे जवळपास २२२ विभाग आहेत ज्यामध्ये शाखा टपाल कार्यालय आणि उप कार्यालय आहे, ज्यात तीन के चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे. पीएम किसान सन्मान निधी, जनधन आणि श्रमिक यांच्यासह सर्व खातेदार या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) च्या माध्यमातून टपाल खात्याने हा उपक्रम गावागावांत घरोघरी पोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हे काम टपाल सहाय्यक आणि पोस्टमन मायक्रो एटीएमद्वारे करेल. केवळ ज्या ग्राहकांची खाती आधार क्रमांकाशी जोडली गेली आहेत त्यांनाच ही सुविधा मिळू शकेल. मायक्रो एटीएमच्या मदतीने लोकांना फक्त गावात बसून पैसे मिळतील. अशाप्रकारे बँकांकडील पैसे काढण्यासाठी कोणतीही गर्दी होणार नाही.
Share your comments