शेतकरी (farmer)वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते रानात सतत काबाडकष्ट करावे लागते काही वेळेस शेतामध्ये काम करणे सुद्धा शेतकऱ्याच्या चांगलेच जीवावर बेतू शकते. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये शेतात पावसात सुद्धा शेतकरी काम करत असतो त्यामुळे वीज पडण्याचा धोका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात असते. बऱ्याच वेळा विज पडून शेतकरी बांधवांचा जीव सुद्धा जाण्याचा धोका जास्त असतो.
वीज पडून होणारी जीवित हानी टाळण्यासाठी:
वीज कोसळल्यावर शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते त्यामध्ये पिकांची नासाडी, जनावरांची जीवित हानी तसेच जीवाला धोका मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे विजेपासून वाचण्यासाठी काही उपाययोजना करणे खूप महत्वाचे आणि शेतकरी बांधवांच्या फायदेशीर ठरणार आहे.मोसमी पावसाच्या काळात वीज पडून होणारी जीवित हानी टाळण्यासाठी भारतीय हवामान विभागाने दामिनी नावाचे अँप लाँच केले आहे. हे अँप प्ले स्टोर वर सुद्धा उपलब्ध आहे. हे अँप प्रत्येक शेतकरी बांधवांनी वापरावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
हेही वाचा:केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता गव्हानंतर साखरेच्या निर्यातीवर 1 जून पासून बंदी
हिंगोली जिल्ह्यात सुरक्षात्मक उपाययोजनंतर्गत सर्व लहान मोठ्या तालुक्यांतील संपूर्ण सरकारी यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कृषिसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर यांना हे ॲप डाउनलोड करून वापर करण्याबाबत प्रवृत्त करावे. तसेच त्याचा वापर सुदधा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
दामिनी’ हे ॲप जीपीएस लोकेशन नुसार काम करते. वीज पडायच्या आधी 15 मिनिटे अँप मध्ये परिस्थिती दर्शवता येते. अशा टाइम ला एकाद्या सुरक्षित ठिकाणी जावे आणि झाडाचा आश्रय टाळावा, झाडाखाली उभे राहणे टाळावे. तसेच गावातील नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांना हे दामिनी अँप डाउनलोड करून घ्यावे आणि त्याबाबत सूचना द्याव्यात यासाठी विविध माध्यमांतून प्रसिद्धी द्यावी.
हेही वाचा:मोदी सरकार 'जन समर्थ' हे कॉमन पोर्टल सुरू करणार,अनेक सरकारी योजना एकाच ठिकाणी उपलब्ध
दामिनी हे अँप शेतकरी बांधवांसाठी तसेच प्रत्येक लोकांसाठी महत्वपूर्ण आणि फायदेशीर आहे. दामिनी अँप चा वापर करून आपण एकादी जीवित हानी टाळू शकतो आणि आपला जीव वाचवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने हे दामिनी अँप आपल्या मोबाइल मध्ये इन्स्टॉल केले पाहिजे आणि वापर केला पाहिजे. बऱ्याच वेळा रानात गेल्यावर वीज पडून शेतकरी बांधवांचा किंवा जनावरांचा जीव जातो हे सर्व टाळण्यासाठी दामिनी अँप चा वापर महत्वाचा आणि फायदेशीर आहे.
Share your comments