शेतकरी आंदोलनावर अमेरिकेची प्रतिक्रिया; चर्चेतून मतभेद करा दूर

04 February 2021 03:17 PM By: भरत भास्कर जाधव
अमेरिकेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

अमेरिकेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

भारतातील शेतकरी आंदोलनाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ लागली आहे.
शेतकरी आंदोनलनाला ग्लोबल सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत असून आता अमेरिकेने या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने भारताच्या नवीन कृषी कायद्यांचे स्वागत केले आहे. अमेरिकेने असं म्हटलं आहे की, जगातील बाजारावर नव्या कृषी कयद्यामुळे प्रभाव वाढेल. अशा प्रकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

हेही वाचा : संयुक्त किसान मोर्चा ६ फेब्रुवारीला करणार देशव्यापी चक्का जाम

शेती कायद्यास शांततापूर्ण विरोध हा भरभराट होणाऱ्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या कायद्याबद्दल मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करता येऊ शकतात. अमेरिकेने म्हटले की, भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्यांचे स्वागत आहे.
परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, बायडेन सरकार कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या निर्णयाचे समर्थन करते.

 

नवीन कृषी कायदे खासगी गुंतवणुकीस आकर्षित करतात आणि शेतकर्‍यांसाठी अधिकाधिक बाजारपेठांना आकर्षित करू शकतात. अमेरिकेने भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्या निर्णयाचे स्वागत केले आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

US शेतकरी आंदोलन अमेरिका कृषी कायदे agriculture laws farmers protest farmer agitation
English Summary: US response to the peasant movement; Avoid disagreements

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.