Nashik News :
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे. तसंच जोपर्यंत सरकार निर्यात शुल्क आणि आमच्या मागण्या पूर्ण करत नाही. तोपर्यंत संप सुरुच राहणार, असा इशारा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने केंद्र सरकारला दिला आहे. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला संपाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्हा कांदामध्ये अग्रेसर आहे. तसंच या जिल्ह्यातील बाजारपेठा आशियात ओळखल्या जातात. पण कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा काढण्याता आला नसल्याने येथील व्यापाऱ्यांनी आजपासून (दि.२०) संपाची हाक दिली आहे.
कांदा व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लासलगावसह जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांसह उपबाजार समितीत संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे बाजार समितीत आज सुकसुकाट पाहण्यात मिळाला. लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी होणार असून कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांची काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचे ठरवले आहे.
सध्या नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक सुरु होती. मात्र आता व्यापाऱ्यांनी संपाचा बडगा उगारल्यामुळे कांद्याचे भाव घसरण्याची शक्यता आहे. लासलगाव ही कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आता या बाजार समित्या जास्त दिवस बंद राहिल्या तर कांद्याची आवक वाढणार आहे. आणि त्यामुळे पुन्हा कांद्याचे भाव घसरण्याची शक्यता आहे. आणि याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
Share your comments