राज्यातील अनेक जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. या अवकाळीचं संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला काही तयार नाही. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका हा उन्हाळी पिकांना बसणार आहे. तर हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस
वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. राज्य सरकारने लवकरात लवकर आर्थिक साहाय्य द्यावे अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
वर्धा जिल्ह्यात गारपिटी
वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात काल पुन्हा गारपीटसह पाऊस झाला. यात उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे अचानक होत असलेल्या वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. देवळी तालुक्याच्या अनेक भागात गारपीटही झाली आहे. वर्धा, सेलू, कारंजा व हिंगणघाट या भागात पावसाने हजेरी लावली.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायचे नाव घेत नाही. पुन्हा एकदा परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये वादळी वारे गारांसह जोरदार पाऊस बरसला आहे. लिंबगाव चुडावा तसेच पूर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या अवकाळीमुळे अक्षरशः ज्वारीसह ऊसही आडवा झाला आहे.
कपिल जाचक यांना केळीरत्न पुरस्कार, अधिक उत्पादन घेतल्याने परिषदेकडून सन्मान..
हिंगोली जिल्ह्यालाही अवकाळीचा फटका
हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा जवळा-पांचाळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारांचा पाऊस झाल्याने याचा फटका केळीच्या बागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. या पावसामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान
यवतमाळच्या बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल अवकाळी पावसात भिजला आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेले सोयाबीन आणि चना हे अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले. आणि यातून शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.
पुढील चार दिवस राज्यात अवकाळीचं संकट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात उद्यापासून पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात उद्या अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या:
नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योगातून शेतकरी दाम्पत्याची भरारी
बंपर कमाई! याठिकाणी शेतकरी एका खास पद्धतीने भेंडी पिकवतात, दर 100 रुपये किलो, जाणून घ्या..
खाद्य तेलाचे दर वाढणार की कमी होणार, जाणून घ्या..
Share your comments