1. बातम्या

साखर उद्योग -वैचारिक सेतु परिषदेला अभुतपुर्व प्रतिसाद

पुर्वीच्या काळात साखर कारखाने हे इको- सोशल माॕडेल होते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
साखर उद्योग -वैचारिक सेतु परिषदेला अभुतपुर्व प्रतिसाद

साखर उद्योग -वैचारिक सेतु परिषदेला अभुतपुर्व प्रतिसाद

पुर्वीच्या काळात साखर कारखाने हे इको- सोशल माॕडेल होते. राष्ट्रीय जैवइंधन धोरण-2018 व इथेनाॕल मिश्रण धोरण (Ethanol Blended Petrol Programme) प्रमाणे सन 2025 पर्यंत 20% इथेनाॕल पेट्रोल मध्ये मिसळण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट आखले आहे. त्यामुळे आता कारखान्यांचे बायोएनर्जी हब मध्ये परिवर्तन होत आहे.शेतकऱ्यांच्या दृष्टीने, ह्या उद्योग क्षेत्राची भरभराट आणि पर्यायाने ग्रामीण विकास होण्यासाठी अनेक प्रश्न निगडीत आहेत.बदलेल्या परिस्थितीत साखर उद्योगापुढील आव्हाने व धोरण बदल या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सदर च्या कार्यक्रमात साखरेची किमान विक्री किंमत (MSP), साखरेला द्विस्तरीय भाव, उसाच्या FRP बाबत धोरण, दोन साखर कारखान्यामधील हवाई अंतर, 

 इथेनॉल निर्मिती व त्याचा उसाच्या FRP वर परिणाम, अतिरिक्त उसाचा प्रश्न, सहकारी साखर कारखाने VS खाजगी साखर कारखाने - यांचे कामकाज व्यवस्थापन, गुजरात किंवा अन्य राज्यातील साखर कारखान्यांना अभ्यास भेटी, इतर उप पदार्थांच्या मूल्यवर्धन नफा निधीचे वाटप सूत्र, ठिबक सिंचन वाढवणे व इतर अनुषंगिक विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा झाली. 

सदरच्या चर्चे मध्ये मी ह्या परिषदेची पार्श्वभूमी व प्रयोजन बाबत प्रास्ताविक केले.

वरील विषयातील चर्चे मध्ये दत्ताराम रासकर, C.E.O. श्रीनाथ म्हस्कोबा सा. कारखाना, साहेबराव खामकर, 

मा. कार्यकारी संचालक यशवंत सह. सा. का थेऊर व प्रतापगड स. सा. का.अनंतराव निकम, माजी कार्यकारी संचालक (West Indian Sugar Mill Associations ), विजय वाबळे, विशेष कार्यकारी अधिकारी, घोडगंगा स सा, भारत तावरे, जनरल मॅनेजर श्री. दत्त इंडिया प्रा. लि., अजित चौगुले, एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर West indian sugar mills association, भोरकडे, वर्क्स मॅनेजर नॅचरल शुगर, उद्योजक राहुल म्हस्के, संपतराव साबळे, माजी साखर संचालक, सी. एच. घुले, माजी कार्यकारी संचालक, थेऊर, सरव्यवस्थापक भारत तावडे, दिलीप वारे, गोरख ससाणे, इथेनाॕल कन्सलटंट बी. एच. श्रीकांत, 

डाॕ. दिपक गायकवाड त्याच प्रमाणे इतर मान्यवर रावसाहेब आयतोडे व शेतकरी प्रतिनिधींनी सुद्धा चर्चेत सहभाग घेतला. 

असे ही ठरविण्यात आले की पुढील तपशीलवार चर्चे साठी एक 15 जणांची अभ्यास समिती नेमण्यात यावी.

दत्ताराम रासकर यांनी सर्व चर्चेचा गोषवारा घेऊन योग्य त्या दुरुस्त्या व सुचना केल्या. फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्स चे सेक्रेटरी राहुल माने यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

संजीवनी उद्योग समूहाचे जनक व माजी अध्यक्ष, माजी मंत्री सहकाराचे महामेरू मा. कै.शंकरराव कोल्हे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

 

सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518

एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!

English Summary: Unprecedented response to the response Industry-Ideological Bridge Council Published on: 01 April 2022, 02:04 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters