दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर आता लवकरच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. शाळा-महाविद्यालयीन परीक्षा ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात आल्या. मात्र, आता कोरोनाचे संकट ओसरलं असून, यंदा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होत आहेत.
यंदा ऑफलाईन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रति तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. अर्थात, हा जास्तीचा वेळ फक्त उन्हाळी (मार्च/ एप्रिल- 2022) परीक्षेपुरताच असणार आहे.
पत्रात म्हटलं होतं, की “गेली दोन वर्षे (एमसीक्यू) ‘बहुपर्यायी प्रश्न’ या पद्धतीने परीक्षा झाल्या. त्यामुळे पेपरसाठी आवश्यक लिखाणाचा सराव राहिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा ते एक तास वेळ वाढवून दिल्यास, विद्यार्थ्यांचा पेपर वेळेत पूर्ण होईल व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
कुलगुरुंच्या बैठकीत निर्णय
दरम्यान, या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. 13) कुलगुरुंची बैठक झाली. त्यात ऑफलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानंतर वेळ वाढविण्यासंदर्भात मुंबई विद्यापीठाने ‘ऑफलाईन’ प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेसाठी परिपत्रकही जारी केले आहे.
तसेच, मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट केलं असून, त्यात म्हटलंय, की “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती. त्यानुसार या परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीनेच झाले. विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव राहिलेला नाही. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देताना विद्यार्थ्यांची अडचण होऊ शकते. त्यामुळे पेपरसाठी वेळ वाढवून देण्याबाबत युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई, कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवले होते.
यामुळे परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
Share your comments