1. बातम्या

शेतकऱ्यांसाठी अनोखी स्पर्धा, राज्य सरकारकडून मिळणार ही मोठी बक्षिसे!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शेतकऱ्यांसाठी अनोखी स्पर्धा, राज्य सरकारकडून मिळणार ही मोठी बक्षिसे!

शेतकऱ्यांसाठी अनोखी स्पर्धा, राज्य सरकारकडून मिळणार ही मोठी बक्षिसे!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या शेतकऱ्यांचा राज्य सरकारतर्फे बक्षिस देऊन गौरव केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

शेतीतून जास्तीत जास्त पीक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग केले जातात. कमी खर्चात जास्त उत्पादन घेतात,produce more at less cost,अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा (Crop Competition) आयोजित करण्यात आली आहे.. त्यात शेतकऱ्यांना राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर बक्षिसे दिली जाणार आहेत.

कृषी विभागामार्फत आयोजित या पीक स्पर्धेत खरीप हंगामातील 11 पिकांचा समावेश करण्यात आला आहे.. त्यात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफुल या पिकांचा समावेश आहे. कमी खर्चात या पिकांचे जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे.. स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

अशी असेल स्पर्धा प्रत्येक तालुक्यात किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10, तर आदिवासी गटासाठी 5 असेल. शेतकऱ्याने कमीत कमी 10 आर क्षेत्रावर पिकाची सलग लागवड केलेली असावी. संबंधित पिकाची स्पर्धा तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोगाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4 असेल.

शेतकऱ्यांना एका वेळी एकापेक्षा जास्त पिकांच्या स्पर्धेतही भाग घेता येईल.. स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये आहे.. स्पर्धकांनी विहित नमुन्यात अर्ज भरून प्रवेश शुल्क चलन, 7/12 व 8-अ उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) अर्जासोबत कृषी कार्यालयात मुदतीपूर्वी सादर करावे.

किती बक्षिसे मिळणार.?तालुका पातळी- प्रथम- 5 हजार रुपये, द्वितीय- 3 हजार रुपये व तृतीय- 2 हजार रुपयेजिल्हा पातळी – प्रथम – 10 हजार रुपये, द्वितीय – 7 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपयेविभाग स्तर – प्रथम 25 हजार रुपये, द्वितीय 20 हजार रुपये व तृतीय 15 हजार रुपयेराज्य स्तर – प्रथम 50 हजार रुपये, द्वितीय 40 हजार

रुपये व तृतीय 30 हजार रुपये.प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच त्यांच्या प्रयोगाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी राज्य सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे.. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे..

English Summary: Unique competition for farmers, big prizes from the state government! Published on: 09 August 2022, 05:57 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters