वाशिम - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत पेरणीपूर्व केलेल्या जनजागृतीमुळे रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन लागवडीत वाढ झालेली आहे .जागतिक बँकेच्या अर्थसाहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात हवामान अनुकूल तंत्रज्ञान राबविण्यासाठी शेती शाळा या घटका अंतर्गत प्रकल्प गावात बीबीएफ पेरणी व त्याचे फायदे यावर व्यापक जनजागृती जागृती करण्यात आली . याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात बीबीएफ तंत्रज्ञान द्वारे पेरणी खालील क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली.
मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे या तंत्रज्ञानाचे फायदे अधोरेखित झाले आहे तसेच शेतामधील पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली आहे . यामुळे पाण्याचे मूलस्थानी जलसंधारण होण्यास मदत होते .आताची काळाची गरज लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा व बेड या पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन कृषी विभाग तर्फे करण्यात येत आहे.सदर प्रकल्पामध्ये जनजागृतीसाठी माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शंकरराव तोटावार ,उपविभागीय कृषी अधिकारी श्री निलेश ठोंबरे व तंत्रज्ञान समन्वयक ज्ञानेश्वर तायडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
वाशिम - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत पेरणीपूर्व केलेल्या जनजागृतीमुळे रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन लागवडीत वाढ झालेली आहे .जागतिक बँकेच्या अर्थसाहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात हवामान अनुकूल तंत्रज्ञान राबविण्यासाठी शेती शाळा या घटका अंतर्गत प्रकल्प गावात बीबीएफ पेरणी व त्याचे फायदे यावर व्यापक जनजागृती जागृती करण्यात आली . याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात बीबीएफ तंत्रज्ञान द्वारे पेरणी खालील क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली.
मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे या तंत्रज्ञानाचे फायदे अधोरेखित झाले आहे तसेच शेतामधील पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली आहे .यामुळे पाण्याचे मूलस्थानी जलसंधारण होण्यास मदत होते .आताची काळाची गरज लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा व बेड या पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन कृषी विभाग तर्फे करण्यात येत आहे.सदर प्रकल्पामध्ये जनजागृतीसाठी माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शंकरराव तोटावार ,उपविभागीय कृषी अधिकारी श्री निलेश ठोंबरे व तंत्रज्ञान समन्वयक ज्ञानेश्वर तायडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
Share your comments