MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

शनिवारपासून उकाड्याची 'साडेसाती' संपेल, हवामान खात्याने दिली सूखवार्ता; मान्सून लवकरच होणार सक्रिय

वाढत्या तापमानाने बेजार झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
शनिवारपासून उकाड्याची 'साडेसाती' संपेल, हवामान खात्याने दिली सूखवार्ता; मान्सून लवकरच होणार सक्रिय

शनिवारपासून उकाड्याची 'साडेसाती' संपेल, हवामान खात्याने दिली सूखवार्ता; मान्सून लवकरच होणार सक्रिय

हवामान खात्याने 13 मेनंतर राजस्थान वगळता देशात कुठेही उष्णतेची लाट येणार नसल्याची सूखवार्ता दिली आहे. त्यानुसार, 11 ते 13 मेपर्यंत दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश व अर्ध्या मध्य प्रदेशात उष्णतेच्या झळा वाढतील. पण, 14 मेनंतर तापमानात झपाट्याने घट सुरू होईल.तापमानातील ही घसरण 24 मेपर्यंत कायम राहील. त्यानंतर पुढील काही दिवस तापमानात काहीशी वाढ होऊ शकते. पण, केरळात मान्सून धडकल्यानंतर लगेचच मध्य भारतात मान्सूनपूर्व पाऊस सुरू होईल. यामुळे तापमानात आपसूकच घट होईल.केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख 1 जून आहे, यावेळी अंदमानमध्ये तो 18 मे पर्यंत पोहोचेल.

अंदमानमध्ये मान्सूनचे 12-13 दिवस अगोदर आगमन यंदा मान्सून अंदमानात 12 ते 13 दिवसअगोदर पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 1 जून रोजी तो केरळला धडक देईल. या हिशोबाने मान्सून 18 मेपर्यंत अंदमानमध्ये पोहोचेल. यामुळेही जनतेची वाढत्या गरमीपासून सुटका होईल.मान्सून केरळमध्ये धडकल्यानंतर देशात पावसाळ्याची सुरूवात होते. हवामान विभागाने अद्याप मान्सून अंदमानमध्ये लवकर पोहोचण्याची घोषणा केली नाही. पण, संशोधकांनी तसा दावा केला आहे. दुसरीकडे, हवामान विभागाच्या विविध मासिक अंदाजानुसार, 20 मेनंतर केरळमध्ये पाऊसमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. वैज्ञानिकांनी हे मान्सूनचे संकेत असल्याचे म्हटले आहे.

तिसऱ्या आठवड्यात, दक्षिणेकडील राज्ये, ईशान्य व उत्तरेकडील डोंगराळ राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल.13 मेच्या सायंकाळपासून कमी होणार तापमान यंदा उकाड्यापासून लवकर होणाऱ्या सुटकेमागे पश्चिमी विक्षोभ अर्थात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा हात आहे. त्याचा प्रभाव 13 मे रोजी सायंकाळपासून दिसून येईल. 11 ते 13 मेपर्यंत महाराष्ट्रासह 5 राज्यांत उष्णतेची लाट येणार असली तरी त्याची दाहकता एप्रिलसारखी असणार नाही. IMD चे हवामान तज्ज्ञ आर.के. जेनामनी यांनी सांगितले की, 13 मे रोजी सायंकाळपासून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर-पश्चिम भारतातील तापमानात घट होईल.मे महिन्याचा तिसरा आठवडा पहिल्या 2 आठवड्यांच्या तुलनेत कमी उष्ण राहील. कारण, 18 मेनंतर आणखी एका वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येईल. तिसऱ्या आठवड्यात दक्षिण भारत,

ईशान्य व उत्तरेतील डोंगराळ राज्यांत पावसाचा जोर वाढेल. यामुळे वायव्येतील पठारी भागातील तापमान नियंत्रणात राहील. तथापि, चौथ्या आठवड्यात थोडीशी वाढ होईल. पण, ते फार काळ चालणार नाही.मध्य प्रदेशात सध्या उष्णतेची लाट आली आहे. येथील 20 शहरांत यासंबंधीचा इशारा जारी करण्यात आला आहे.असनी वादळाच्या प्रभावामुळे ओलावा येईल असनी वादळ ओडिशा किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याच्या प्रभावामुळे बंगालच्या खाडीत ओलावा निर्माण होण्यास सुरुवात होईल. यासोबतच आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स १२ मेपर्यंत सक्रिय होत आहे. त्याच्या प्रभावामुळेही 12 मेनंतर उकाड्यापासून दिलासा मिळेल. यामुळे मध्य भारतातील अनेक राज्यांवर ढगांची गर्दी वाढून तापमानाचा पारा घसरेल.

 

𝐄-शेतकरी अपडेट्स

English Summary: Ukada's 'SadeSati' will end from Saturday, good news given by Meteorological Department; Monsoon will be active soon Published on: 13 May 2022, 12:17 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters