1. बातम्या

उज्ज्वला योजना : मोफत दिल्या जाणाऱ्या घरगुती गॅसच्या योजनेत बदल

केंद्र सरकारने पंतप्रदान उज्ज्वला योजना म्हणजे पीएमयूवायच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या तीन मोफत घरगुती गॅस सिलिंडरची योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान घोषणा करण्यात आली होती की, १ एप्रिलपासून ते ३० जून दरम्यान तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

केंद्र सरकारने पंतप्रदान उज्ज्वला योजना म्हणजे पीएमयूवायच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या तीन मोफत घरगुती गॅस सिलिंडरची योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान घोषणा करण्यात आली होती की, १ एप्रिलपासून ते ३० जून दरम्यान तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील. देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग अधिक होऊ नये यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयामुळे ्अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. काम नसल्याने लोकांच्या हाती पैसा नसल्याने नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार होता. यावर उपाय म्हणून मोदी सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजना लागू केली. त्या अंतर्गत नागरिकांना मोफत अन्न धान्य आणि मोफत सिलिंडर देण्याची योजना आखण्यात आली. नागरिकांना उज्ज्वला योनजेतून तीन महिन्यासाठी मोफत गॅस सिलिंडर देण्यात आले. यासाठी सरकारकडून निधी ही देण्यात आला. 

सिलिंडर खरेदी करण्यासाठी सरकारकडून ग्राहकांच्या खात्यामध्ये आधीच पैसे टाकले जात होते. परंतु तिसऱ्या गॅस सिलिंडरचे पैसे ग्राहकांनाच द्यावे लागतील. काही दिवसांनंतर या सिलिंडरचे पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा होतील. तिसऱ्या गॅस सिलिंडरसाठी पैसे आधी मिळणार नाहीत. याविषयीचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.  आयओसीचे विपणन व्यवस्थापक सुधीर कश्यप म्हणाले की, आता बँक खात्यात तेव्हाच पैसे येतील जेव्हा गॅस सिलिंडरची खरेदी केली जाईल. या अंतर्गत तेल कंपनी एलपीजी वितरणाचे खात्री करतील. म्हणजे संबंधित एलपीजी वितरक तेल कंपनींना सुचना देतील आणि डाटा तेल कंपनींच्या वेबसाईटवर अपडेट होईल. तेव्हा संबंधित ग्राहकांच्या खात्यात पैसे टाकले जातील.

English Summary: ujjwala yojana center changes three free lpg gas scheme Published on: 27 June 2020, 11:57 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters