केंद्र सरकार नागरिकांचे जीवनमान सुधरवण्यासाठी अनेक योजना आखत असते. त्यात काळानुसार बदल देखील केले जातात. मात्र सध्या बऱ्याच योजना या केवळ नावापुरत्याच राहिल्या आहेत. त्या योजनांचा लाभार्त्याना फायदा होत नाही. सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) देखील अनेक योजना या अपूर्ण आहेत. शिवाय पाण्यावाचून शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयातून इंदापूर (Indapur) तालुक्यातील लाकडी-निंबोणी या उपसा सिंचन योजनेसाठी पाणी देण्याचा डाव आखण्यात आला आहे. मात्र उजनीचे पाणी लाल झाले तरी बेहत्तर पण हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने मागेच दिला होता.
सध्या हे प्रकरण फारच चिघळले आहे. पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक असतात. मात्र हे पालकमंत्री जिल्ह्याला कुपोषित ठेवण्याचे काम करत आहेत. आमचा डोळा पालकमंत्र्यांच्या पदावर नसून पाण्यावर आहे. आम्हाला फक्त आमच्या हक्काचे पाणी दिसत आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रवक्ते रणजित बागल यांनी दिली.
वेळ पडली तर रक्त सांडू पण हक्काचा एक थेंबही जावू देणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला. लाकडी निंबोडी योजनेंतर्गत उजणीचे पाणी नेण्यास विरोध असल्यामुळे आज पंढरपूर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपरी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली होती.
जिल्ह्याचा पालकमंत्र्यांकडून अपेक्षाभंग झाला आहे. तसेच भरणे मामांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोड बोलून 'मामा' बनवण्याचे काम केलं आहे. यामुळे त्यांना जिल्ह्यातील शेतकरी निश्चितच चांगला हिसका दाखवतील असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला. उजणीचे पाणी देण्यास आमचा कडाडून विरोध असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे.
दोन भावांनी फुलशेतीतून फुलवले आयुष्य; आज लाखोंमध्ये खेळतात
या बाबत सोलापूर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने हा निर्णय माघारी घेतला नाही तर येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या प्रसंगी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
योजेबद्दल -
राज्य सरकारने लाकडी निंबोडी उपसा सिंचन या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. व या माध्यमातून इंदापूर आणि बारामती तालुक्यातील 17 गावांसाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. या योजनेसाठी जवळजवळ 348 कोटी 11 लाख रुपयांच्या अंदाजपत्रक किंमतीस प्रशासकीय मान्यता देखील
देण्यात आली आहे. मात्र या योजनेस सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि काही राजकीय लोकांचा विरोध आहे.
महत्वाच्या बातम्या:
बारामतीच्या शेतकऱ्यांचा नादच खुळा; पवार साहेबांनी थोपटली पाठ, म्हणाले...
मोदींनी घेतलेल्या साखर निर्यात बंदीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले ...
Share your comments