सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. सर्व पक्षीय आमदार सध्या मुंबईत आहेत. असे असताना मंत्रालय एक थरारक घटना घडली. काही मराठा तरुण मंत्रालयाच्या टेरेसवर जाऊन बसले होते. प्रशासनाच्या कारभारामुळे त्रस्त होऊन आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल त्यांनी उचलल्याची माहिती आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली, हे तरुण मंत्रालयावर गेले असता पोलिसांची मोठी पळापळ झाली. त्यातील एक युवक अर्धा तास टेरेसवर खाली पाय सोडून बसला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके खाली येत होते, पोलिसांची पळापळ बघताच त्यांनी माहिती घेतली आणि ते देखील पळत वरती गेले. त्यांनी धावत जाऊन उपस्थित कर्मचाऱ्यांच्या मदतीने या तरुणांची समजूत घालून त्यांना खाली उतरवले.
यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. निलेश लंके म्हणाले, मंत्रालयातून काम उरकून खाली येत असताना मंत्रालयाच्या टेरेसवर काही युवक गेल्याचे कळाले. तेव्हा मी स्व:ता पळत गेलो. यावेळी माझ्यासोबत काही अधिकारी होते. आम्ही त्यांना आवाज दिला तर तर दोन पाऊले जरी पुढे आलात तर उडी घेऊ असे युवकांनी म्हटले. ते ऐकायला तयार नव्हते.
विधानभवनासमोर राडा! आई बहिणीवरून शिवीगाळ, आमदारांच्यात हाणामारी...
तेव्हा मी त्यांच्याशी फोनवरुन बोललो आणि विश्वास दिला. मग त्यांनी मला जवळ येऊ दिले. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांची समजूत घातली आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. यामुळे या तरुणांचे जीव वाचले आहेत. नाहीतर मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान, मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही आजच्या दिवसातील दुसरी घटना आहे.
शिवार ते ग्राहक शेतीमाल विक्रीसाठी राजू शेट्टी आग्रही, मोदी सरकारकडे केली मोठी मागणी
एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. सुभाष भानूदास देशमुख, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते उस्मानाबादमधील धाराशिवचे रहिवासी आहेत. घटनेत भाजलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते. यामुळे असे किती प्रकार घडणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या;
इतर आमदार एकमेकांवर तुटून पडले, पण 'या' आमदाराचे होतेय कौतुक, धक्काबुक्की होताच पळत आले आणि..
'CM Eknath Shinde: शेतकरी भावांनो, तुमचा जीव झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही, मी कासावीस होतो'
शेतकरी घरबसल्या कमवणार पैसे! शेतकरी 'पत्रकार' चे पहिले सत्र संपन्न, कृषी जागरणकडून आयोजन...
Share your comments