1. बातम्या

विधानभवनासमोर राडा! आई बहिणीवरून शिवीगाळ, आमदारांच्यात हाणामारी...

सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून आता विरोधक त्यांना घेरण्याची तयारी करत आहेत. असे असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
legislature mla

legislature mla

सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे पहिलेच पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून आता विरोधक त्यांना घेरण्याची तयारी करत आहेत. असे असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत घोषणा देऊन निषेध केला जात होता.आता मात्र ही घटना समोर आल्यानंतर आता मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि सेनेचे महेश शिंदे यांच्यामध्ये ही धक्काबुक्की झाली आहे.

यामुळे लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची लाजीरवाणी कती घडणं राज्याची मान शरमेने खाली घालणारी आहे. हे सर्व आमदारांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. यामुळे आता आमदारांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिंदे सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! 50 हजार, पूरग्रस्तांना मदतीसह केल्या अनेक घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. त्याचवेळी विरोधकदेखील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन करत होते. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात शाब्दीक वाद झाला. यानंतर प्रकरण थेट धक्काबुक्कीपर्यंत गेले.

असे असताना अजित पवार यांनी मार्ग काढत वाद थांबवला. या वादात अमोल मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसून आले. यामुळे मोठा राडा झाल्याचे दिसून आले. यावेळी मोठी घोषणाबाजी करण्यात आली.

अखेर शिंदे सरकारमध्ये २ महिलांना मिळणार स्थान, पुणे जिल्ह्यातून 'या' महिला नेत्याची लागणार वर्णी..

याबाबत अमोल मिटकरी म्हणाले की, शिंदे गटातील नेत्यांनी सर्वात प्रथम शिवीगाळ केली. आई-बहिणींनीवरुन शिवीगाळ केल्याचे मिटकरी यांनी सांगितले. यामुळे प्रकरण खूपच तापले असल्याचे दिसून आले.

महत्वाच्या बातम्या;
'शहाजीबापू पाटील यांनी आमदारकी निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये घेतले होते, मात्र परत केले नाहीत'
Sugarcane FRP; एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही, ऊस उत्पादकांसाठी किसान सभेचा मोठा निर्णय
धक्कादायक! बकरा कापत असल्याचे स्वप्न पाहता पाहता स्वत:चे गुप्तांग कापले, शेतकरी रक्तबंबाळ

English Summary: Cry in front legislature! Abused by mother and sister, clash between MLAs... Published on: 24 August 2022, 12:55 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters