पुणे: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुण्यातील (Pune) चांदणी चौकातील (Chandani Chowk) जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केलीय.
नोएडामधील ३२ मजली इमारत ट्विन टॉवर ज्या कंपनीने पाडले, त्याच कंपनी पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल (Bridge Demolish) पाडणार आहे. १२ ते १५ सप्टेंबरपर्यंत या पुलाचं पाडकाम होणार आहे. हा पूल 10 सेकंदात पाडण्यात येणार आहे.
'एकरकमी FRP घेतल्याशिवाय राज्यातला एकही कारखाना सुरु होवू देणार नाही'
ज्या कंपनीनं दिल्लीतला ट्विन टॉवर पाडला. त्याच Edifice engineering या कंपनीला या पुलाचे पाडण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे पाडकाम कंट्रोल्ड एक्स्ल्पोजन सिस्टिमद्वारे होणार आहे.
झुकेगा नहीं साला..! कापसाला मिळाला 16 हजाराचा उच्चांकी भाव
कंट्रोल्ड एक्स्प्लोजन म्हणजे काय? What is Controlled Explosion?
१. कमीतकमी वेळेत पाडकाम केले जाते.
२. या पद्धतीमुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण होत नाही.
३. इमारतीचा ढिगारा दूरपर्यंत पसरत नाही.
४. इमारतीमध्ये खास प्रकारची स्फोटके फिट केली जातात.
५. एकाचवेळीत्यांच्यात स्फोट घडवून आणला जातो.
६. दिल्लीची कंपनी पुण्यातला पूल पाडणार आणि पुणेकरांची कोंडीतून सुटका करणार आहे.
१ सप्टेंबर पासून होणार मोठे बदल; थेट होणार खिश्यावर परिणाम...
Share your comments