1. बातम्या

ऑक्टोबरमध्ये ट्रॅक्टर विक्रीत घट; जाणून घ्या एस्कॉर्ट्सने विकले फक्त 12,749 युनिट्स ट्रॅक्टर

ट्रॅक्टर हे असे कृषी यंत्र आहे, ज्याचा उपयोग बहुतांश शेतकरी शेतीसाठी करतात. शेतीची जवळपास सर्व कामे ट्रॅक्टरच्या मदतीने सहज पूर्ण करता येतात. अशा स्थितीत ट्रॅक्टरची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते, मात्र ऑक्टोबरमध्ये ट्रॅक्टर खरेदीत लक्षणीय घट झाली आहे. देशातील सर्वात मोठी कृषी उपकरणे उत्पादक कंपनी एस्कॉर्ट्स ट्रॅक्टरने विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

ट्रॅक्टर हे असे कृषी यंत्र आहे, ज्याचा उपयोग बहुतांश शेतकरी शेतीसाठी करतात. शेतीची जवळपास सर्व कामे ट्रॅक्टरच्या मदतीने सहज पूर्ण करता येतात. अशा स्थितीत ट्रॅक्टरची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते, मात्र ऑक्टोबरमध्ये ट्रॅक्टर खरेदीत लक्षणीय घट झाली आहे. देशातील सर्वात मोठी कृषी उपकरणे उत्पादक कंपनी एस्कॉर्ट्स ट्रॅक्टरने विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत.

या आकडेवारीवर नजर टाकल्यास, ऑक्टोबरमध्ये एकूण ट्रॅक्टर विक्री 1.1% ने घटली आाहे. या महिन्यात 13,514 युनिट्सवर आली आहे, तर गेल्या वर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये कंपनीने एकूण 13,664 ट्रॅक्टरची विक्री केली. एका निवेदनात असे सांगण्यात आले आहे की ऑक्टोबर 2021 मध्ये देशांतर्गत ट्रॅक्टरची विक्री 12,749 युनिट्स झाली आहे, तर ऑक्टोबर 2020 मध्ये ती 13,180 युनिट्स होती. अशाप्रकारे, ट्रॅक्टर विक्रीत 3.3% ची घट झाली आहे. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये निर्यातीचा हिस्सा देखील समाविष्ट असतो. निर्यात 484 च्या तुलनेत 765 युनिट्सवर होती, जी 58.1% ची वाढ दर्शवते.

कृषी तज्ज्ञ काय म्हणतात?

कृषी क्षेत्रातील सकारात्मक वाढ हे याचे सर्वात मोठे कारण असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. म्हणजेच ट्रॅक्टरच्या विक्रीतून कृषी क्षेत्रातील फील-गुडची कल्पना येऊ शकते. खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांकडे पैसा असून कर्ज फेडण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ट्रॅक्टर खरेदीत वाढ झाली आहे.

 

तथापि, रब्बी पिकाच्या पेरणी आणि काढणीच्या चक्रात विलंब झाल्याने नोव्हेंबरमध्येही या उद्योगात चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे. यंदा पाऊस चांगला झाला असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. यासोबतच पीक उत्पादन आणि चांगल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. शेतकरी बांधव ट्रॅक्टरने शेत तयार करतात. बियाणे, पेरणी, पिकांची लागवड, कापणी आणि मळणी यासह अनेक क्षेत्रात याचा वापर केला जातो. शेतीसाठी हे सर्वात मोठे आधुनिक कृषी यंत्र आहे, त्यामुळे शेतीची व्याप्ती वाढवण्यासाठी ट्रॅक्टरची अधिक विक्री होणे आवश्यक आहे.

English Summary: Tractor sales decline in October, Escorts sold only 12,749 units of tractors Published on: 02 November 2021, 11:07 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters