दोन आठवड्यापूर्वी टोमॅटोच्या भाव गगनाला भिडत होते, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होत होता. पण ह्या दोन आठवड्यात टोमॅटोच्या बाजारभावाला उतरती कळा लागली आहे. 23 नोव्हेंबरला टोमॅटोला विक्रमी भाव मिळत होता, या दिवशी टोमॅटोने शंभरी पार केली होती. पण सध्या टोमॅटो रिटेल मार्केट मध्ये फक्त 40 रुपये किलोणे विकला जात आहे
असे सांगितले जात आहे की, अवकाळी मुळे टोमॅटोचे भाव कमालीचे वाढले होते. आता अवकाळीने उघडीप दिल्यानंतर टोमॅटोच्या भावात लक्षणीय घट झाली आहे. शेतकऱ्याला आता आपले सोन्यासारखे टोमॅटो फक्त 15 ते 20 रुपये किलोने विकावे लागत आहेत, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी परत एकदा संकटात सापडल्याचे चित्र दिसत आहे.
भारतात बऱ्याचशा राज्यात टोमॅटो लागवड केली जाते. सर्व्यात जास्त टोमॅटो लागवडीचे क्षेत्र आंध्र प्रदेश मध्ये आहे, महाराष्ट्रात देखील टोमॅटो लागवड उल्लेखनिय आहे. ऑनलाईन मंडी इ-नाम नुसार आंध्रप्रदेशच्या चित्तूर मध्ये टोमॅटोला पाच डिसेंबर रोजी फक्त 18 रुपये किलो भाव मिळाला, तर पालमनेर मंडी मध्ये हा भाव 15 रुपये किलो एवढाच होता.
महाराष्ट्रात टोमॅटोला मिळतोय सर्व्यात कमी भाव
पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात टोमॅटोसाठी राज्यातील सर्व्यात मोठी बाजारपेठ आहे. नाशिक मध्ये टोमॅटोला ऍव्हरेज 500 रुपये क्विंटल दर मिळाला तर कमाल भाव हा फक्त 900 रुपये क्विंटल एवढा मिळाला.
त्यामुळे महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. असे सांगितले जात आहे की अवकाळी पावसामुळे टोमॅटोला विक्रमी भाव मिळत होता त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यानंतर लगेचच टोमॅटोचे भाव लुडकलेत.
भाव कमी होण्याचे नेमकं कारण काय?
टोमॅटो उत्पादक शेतकरी आणि विशेषज्ञ असे सांगत आहेत की, आता काही भागात टोमॅटोचे नवीन पीक काढणीला तयार झाले आहे आणि हा नवीन टोमॅटो बाजारात दाखल झाल्यामुळे भाव डाउन होण्याला सुरवात झाली आहे. सर्व्यात मोठ्या टोमॅटो उत्पादक आंध्रप्रदेश राज्यात पूर आणि पावसाचा कहर कमी झाला आहे.
त्यामुळे आंध्र मध्ये किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर खाली आले आहेत. असे असले तरी आताही मध्यस्थ व व्यापारी शेतकऱ्यांकडून टोमॅटो स्वस्तात घेऊन महागात विकत आहेत. शेतकऱ्यांच्या घरातून 10 ते 15 रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो अजूनही किरकोळ बाजारात 40 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे जरी टोमॅटोचे दर खाली आले असले तरी व्यापाऱ्यांना मात्र अजूनही फायदाच होत आहे आणि शेतकऱ्यांची मात्र यात पिळवणूक होत असल्याचे चित्र दिसत आहे.
Share your comments