सध्या सर्वच पालेभाज्यांचे दर वाढत आहेत. असे असताना आता टोमॅटोने कहर केला आहे. दिल्लीत टोमॅटो 150 च्या वर विकला जात आहे. यामुळे तो सर्वसामान्य लोकांच्या बजेटमधून गायब झाला आहे.
बहुंताश राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा टोमॅटोच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच या पावसामुळं टोमॅटो पिकांचं नुकसान देखील झालं आहे.
याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळं बाजारात टोमॅटोचा तुटवडा देखील भासत आहे. यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. मदर डेअरीच्या सफाल विक्री केंद्रात 100 रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत होती.
रायगडावर शेतकरी जागृती अभियानाची सुरुवात, राजू शेट्टी यांनी फुंकले रणशिंग..
तर बिगबास्केटवर टोमॅटोचे दर हे 105 ते 110 रुपये किलोवर आहेत. टोमॅटोचे दर केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नाही तर देशाच्या इतर भागातही वाढले आहेत.
टोमॅटोच्या दरात वाढ ही हवामानातील झालेल्या बदलामुळं झाल्याचे सरकारनं म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसामुळे हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधून टोमॅटोचा पुरवठा झपाट्याने कमी झाला आहे.
आता फक्त कालवडच जन्माला येणार! या सरकारने घेतला मोठा निर्णय..
आता दिल्ली-एनसीआर क्षेत्रासाठी हिमाचल प्रदेश हा एकमेव पुरवठादार असल्याची माहिती अशोक कौशिक यांनी दिली. आता काही दिवस हे दर असेच असतील.
आज जागतिक फणस दिवस, जाणून घ्या फणसाचे आरोग्यासाठीच फायदे
या राज्यात आता देशी गायींच्या संगोपनासाठी योगी सरकार देणार ४० हजार रुपये
एका अंड्याची कमीत चक्क १०० रुपये, जाणून घ्या काय आहे खासियत..
Share your comments