1. बातम्या

बांगलादेश सीमेवर अडकलेल्या टोमॅटो, कांद्याचे ट्रक पोहचणार बाजारपेठांमध्ये ; शेतकऱ्यांना दिलासा

कोरोना व्हायरसमुळे अंतरराष्ट्रीय बाजारांमधील शेतीमालाच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. बाजारात शेतमाल उशिरा पोहोचत असल्याने पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय येत आहे.

KJ Staff
KJ Staff


कोरोना व्हायरसमुळे अंतरराष्ट्रीय बाजारांमधील शेतीमालाच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. बाजारात शेतमाल उशिरा पोहोचत असल्याने पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय येत आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रातून निर्यात होणारा कांदा, टोमॅटो आणि द्राक्षांच्या परदेशात विक्री होणार असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.  कोरोनामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा बांग्लादेश सीमेवर अडकलेला माल आता निर्यातीसाठी मोकळा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक, निफाड परिसरातल्या शेतकऱ्यांचा कांदा, टोमॅटो आणि द्राक्षेसारखा शेतमाल बांग्लादेश सीमेवर काही दिवसांपासून अडकलेला होता.

साधारण  साडेतीन हजार ट्रक माल गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश सीमेजवळ महादीपूर इथे अडकून पडला होता. भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर आता ही वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आजपासून ही वाहतूक सुरु होत असल्याचे विनय सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या ट्विटरवरुन जाहीर केले आहे. त्याबाबत बांगलादेश सरकारच्या परवानगीचे पत्रही त्यांनी त्यात जोडले आहे.  त्यामुळे महादीपूर इथून हा माल आता लवकरच बांगलादेशाल्या शिवगंज बाजारपेठेत पोहचणार आहे. सध्या रमजानचा महिना सुरु झाल्यामुळे बांग्लादेशमध्येही या फळांची मागणी वाढली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही संक्रमणाचा धोका होऊ,  नये यासाठी पूर्णपणे सॅनिटाईज करुन या कंटेनरची पुढची वाहतूक होणार आहे. देशात सध्या लॉकडाऊन असले तरी ग्रामीण अर्थव्यवस्था सुरु करण्याकडे सरकारचा भर आहे.  शेतमालाशी संबंधित उद्योग सुरु व्हावेत, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.  निर्यातीसाठी पाठवलेला हा माल मध्येच अडकून पडल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.  निर्यातीस हिरवा कंदील मिळाल्याने आता त्यांना दिलासा मिळणार आहे.

English Summary: tomatoes and onion fruit product will reach to w bengal market; north maharashtra's farmer will happy Published on: 27 April 2020, 12:54 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters