
cabinet decision today meeting
झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून यामध्ये पोलीस शिपाई संवर्गातील वीस हजार पदे भरण्यात येणार असून मराठवाडा,विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र मंडळाचे पुनर्गठनचा निर्णय आजच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय एका दृष्टिक्षेपात
1-राज्यातील विदर्भ,मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रया तीनही विकास मंडळाचे पुनर्घटन होणार.
2- राज्यात फोर्टिफाइड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार.
3- पोलीस शिपाई संवर्गातील 2021 मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंध यामधून सूट देऊन 20 हजार पदे भरणार.
4- इतर मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह सुरू करणार
5-इतर मागास वर्गीय,विजाभज व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता पन्नास विद्यार्थ्यांना मिळणार
6- वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचा वणवा, पाणी हल्ला तसेच तस्कर शिकारी यांच्या हल्ल्यात, प्राण्यांचा बचाव करताना मृत्यू झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देणार
नक्की वाचा:मोठी बातमी: राज्य सरकार शिक्षकांना देणार खूशखबर
7- दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय
8- महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था( प्रवेशशुल्क यांचे विनियमन) अधिनियम सुधारणाची विधेयक मागे घेणार व दुरुस्तीसह पुन्हा लागू करणार
9- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव देणार.
10-राज्यातील शासकीय वैद्यकीय,आयुर्वेद तसेच दंत महाविद्यालयातील पूर्ण ग्रंथपाल,शारीरिक शिक्षण शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू.
नक्की वाचा:ब्रेकिंग! ऊस दर आंदोलन पेटले, शेतकरी संघटनेने थांबवली वाहतूक
Share your comments