शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन स्वाभिमानीच्या वतीने आज राज्यभर चक्काजाम आंदोलन (Agitation) करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टींनी केला आहे.
इस्लामपूरमधील आंदोलनात राजू शेट्टी सहभागी होणार आहेत. वीज दरामध्ये करण्यात येणारी 37 टक्के दरवाढ आम्हाला मान्य नाही. फक्त पाच जिल्ह्यांमध्ये दिवसा वीज दिली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे.
दिवसा वीजेसाठी आम्ही गेल्या वर्षभरापासून आंदोलन करतोय, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांनी अजून किती सोसायचं? ऊस तोडणी मुकादमाकडून शेतकऱ्यांची कोट्यवधी रूपये लुबाडले जात आहेत. बुडवणारे मोकाट फिरत आहेत. पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत.
चारधाम यात्रा 2023: बद्रीनाथ केदारनाथ मंदिर होणार सुरू, तारीख झाली जाहीर
शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, शेतीपंपाचे वाढीव प्रस्तावित वीज दर, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी लूट, कापूस, थकीत उसाची एफआरपी, पीक विमा, अतिवृष्टीची भरपाई, तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम या प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
दरम्यान, शेतकरी (Farmers) प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Saghtana) आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे आता सरकार याकडे लक्ष देणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
जर्सी गाईं चोरणारी टोळी अखेर सापडली, 33 लाखांच्या गाईंची केली होती चोरी..
ओडिशामध्ये दोन दिवसीय 'उत्कल कृषी मेळा' आयोजित, OUAT च्या कुलगुरूंनी केले उद्घाटन
लिलावात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणाऱ्यांचे हातपाय तोडू, बच्चू कडू यांचा थेट इशारा..
Share your comments