1. बातम्या

आज विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता


गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने उडीप दिली आहे. मात्र आजपासून पाऊस परत सक्रिय होणार असून पूर्व विदर्भात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईसह, कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेला मॉन्सूनचा आस पाकिस्तान आणि परिसरावर असलेली पश्चिमी चक्रावाताची स्थिती त्यापासून कोकणापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाने उघडीप दिली. सोमवारी पाकिस्तानपासून कोकणापर्यंतचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

तर मॉन्सूनचा आस दोन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची शक्यता असल्याने राज्यात पाऊस पुन्हा सुरू होणार आहे. दरम्यान गेल्या २४ तासांमध्ये रायगडमधील उरण येथे १२९ मिलीमीटर मुंबईतील सांताक्रुझ येथे १०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर आज पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा आणि काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters