वैदर्भीय शेतकरी केंद्रबिंदू मानून सरळ- साधे -सोपे परिस्थितीजन्य कालसुसंगत व्यावसायिक शेती तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसारासह कृषी विद्यापीठ सर्वार्थाने स्वयंपूर्ण करण्याकडे आपला प्राधान्यक्रम असल्याचे सुतोवाच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे नवनियुक्त कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी केले. विद्यापीठाच्या अकोला मुख्यालय आज प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांचेकडून कुलगुरू पदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर आयोजित अधिकारी वर्गाच्या सभेप्रसंगी मार्गदर्शन
करताना ते बोलत होते. महाराष्ट्रासह विदर्भातील एकंदरीत शेती व्यवसायाची जाण असल्याने व गत तीन दशकाहूनही अधिक काळ याच विषयात संशोधनासह सेवा देत असल्याने प्राप्त परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी करावयाच्या उपायोजना कृतीत आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार Efforts will be made to implement measures to increase farmers' income
हे ही वाचा - हवामान विभागाची अधिकृत घोषणा, असा राहील पाऊस आणि या तारखेपासून मान्सून परतीच्या प्रवासाला
असल्याचा आत्मविश्वास डॉ. गडाख यांनी पुढे बोलतांना व्यक्त केला. विद्यापीठातील अत्यल्प मनुष्यबळ, कामगारांच्या समस्या, संशोधन केंद्रांचे प्रश्न सोडवण्यासह दर्जेदार कृषी शिक्षणाच्या पद्धती,
स्पर्धात्मक परीक्षांसाठीची वातावरण निर्मिती, अधिकारी -कर्मचारी वर्गांचे सक्षमीकरण करण्यासह आत्मनिर्भर संशोधन केंद्र तथा कृषी विज्ञान केंद्र प्रणाली सह शैक्षणिक संस्थांचे जाळे संपूर्ण विदर्भ स्तरावर निर्माण करीत स्वयंपूर्ण विद्यापीठाचे स्वप्न साकार करण्याकडे सुद्धा भर देणार असल्याचे डॉ. गडाख यांनी पुढे बोलताना सांगितले.विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्री व सेवा केंद्र स्थापन करण्यासह एकात्मिक पद्धतीने विविध विभागांचे सहकार्य घेत राहुरी प्रमाणेच "मॉडेल
विलेज" संकल्पना विदर्भात राबविण्याचा निर्धार सुद्धा डॉ.गडाख यांनी याप्रसंगी व्यक्त केला. आपल्या अतिशय आत्मविश्वासपूर्ण व धोरणात्मक संबोधनात डॉ. गडाख यांनी भविष्यातील विद्यापीठाचा प्रवास सर्वांनी मिळून सकारात्मक धोरणाचे अवलंबाने प्रगती व स्वयंपूर्णतेकडे करण्यासाठी सर्वांनाच साद घातली व पारदर्शक प्रशासनाचा अवलंब करताना येणाऱ्या अडचणींची सामंजस्य व समुपदेशनाद्वारे सोडवणूक करण्याकडे कल व्यक्त केला.तर शेतकरी श्रीमंत झाल्यास देश श्रीमंत होईल आणि याकरिता देशांतर्गत सर्वच कृषी व अकृषी
विद्यापीठांनी एकत्रित येत एकात्मिक प्रयत्नांची मोट बांधणे कालसुसंगत असल्याचे प्रतिपादन मावळते प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांनी आपल्या संबोधनात केले. कृषी विद्यापीठाकडे काल सुसंगत व अनुभव सिद्ध ज्ञान संपदा असून ग्रामीण भागातील शेतकरी बंधू-भगिनींनी त्यांच्या शेतीविषयक समस्यांसाठी कृषी विद्यापीठाची साथ स्वीकारावी व आपले आणि पर्यायाने देशाचे हित साधावे असे आवाहनही डॉ. मालखेडे यांनी याप्रसंगी केले. कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सभेच्या प्रसंगी विद्यापीठ कार्यकारी
परिषद सदस्य श्री. विठ्ठल सरप पाटील, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ.ययाति तायडे, डॉ. प्रकाश नागरे, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक श्री प्रमोद पाटील, विद्यापीठ अभियंता श्रीमती रजनी लोणारे, विद्यापीठ ग्रंथपाल श्री. ए. बी.भोसले, विद्यापीठातील सर्व वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी
कर्मचारी यांचे सह उपस्थिती होती. राहुरी कृषी विद्यापीठातून विशेषत्वाने उपस्थित झालेले डॉ संजय तोडमल, डॉ.सुरज गडाख, डॉ. महेश घाडगे,डॉ. सचिन सदाफळ, डॉ. पंडित खर्डे, डॉ. डी.पी पाचरणे, डॉ. बी ए देशमुख आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी कुलगुरू पदाचा प्रभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. शरद गडाख यांनी विद्यापीठ शहीद स्मारक येथे विद्यापीठ शहिदांना आदरांजली अर्पण केली व डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्राला भेट देऊन कृषी क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना आदरांजली अर्पण केली.
Share your comments