गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. अनेक शेतकऱ्यांचे ऊस अजूनही उसातच आहेत. यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केल्याने सध्या कारखान्यांवर ताण आला आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे वक्तव्य केलं आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, ऊसाचे क्षेत्र असेच वाढत गेले तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल. ऊस हे शाश्वत पीक असले तरी शेतकऱ्यांनी इतर पिकांचाही आधार घेणे गरजेचे आहे. तसेच उसाच्या सायरपपासून इथेनॉल निर्मिती केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे आता पर्यायच उरणार नाही. यामुळे आता गडकरी यांनी देखील इतर पिके घेण्याचा सल्ला दिला आहे.
उसावर प्रक्रिया करुन इथेनॉलची निर्मिती केली तर अधिकचा फायदा होणार आहे. प्रत्येक कारखान्याने इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचा सल्ला गडकरी यांनी दिला आहे. मात्र, अतिरिक्त उसाची केवळ चिंता आहे. पुढच्या वर्षी यापेक्षा बिकट अवस्था असेल असेही गडकरी यांनी सांगितले. यामुळे सध्या शेतकरी चिंतेत आहेत. सध्या शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे देऊन आपला ऊस तोडून न्यावा लागत आहे.
सध्या ब्राझिलचे साखर कारखाने सुरु नसल्यामुळे साखरेला दर आहे, अन्यथा 22 रुपयेही दर मिळाला नसता असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यामुळे येणाऱ्या काळात हे कारखाने सुरु झाले तर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
यामुळे एकाच पिकाच्या मागे न जात पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढविता येत असल्याचेही त्यांनी सांगितले. वाढत्या उसाच्या क्षेत्राबाबत चिंता व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऊस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक असल्याचे विधान केले होते. यामुळे यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या;
कृषी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थेत शेतीमध्ये क्रांती, मुलांनी फुलवली शेती..
शरद पवार ऊस उत्पादकांना डोळ्यासमोर न ठेवता त्यावर प्रक्रिया करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात
बागायतदार शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी, अवकाळीमुळे बिकट अवस्था..
Share your comments