1. बातम्या

शेतकरीराजांची कौतुकास्पद कामगिरी! तीन शेतकरी राजांनी मिळालेल्या कृषी पुरस्काराची रक्कम दिली मुख्यमंत्री सहायता निधीला

कृषी क्षेत्रामध्ये अमुल्य आणि अतुलनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन मे या दिवशी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
three farmer in maharashtra give return award cash to chief minister fund

three farmer in maharashtra give return award cash to chief minister fund

 कृषी क्षेत्रामध्ये अमुल्य आणि अतुलनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन मे या दिवशी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने  महाराष्ट्रातील 198 शेतकऱ्यांना राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या 198 शेतकऱ्यांपैकी तीन शेतकरी राजांनी  त्यांना मिळालेल्या कृषी पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे व ही रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

 कौतुकास्पद कामगिरी करणारे तीन शेतकरी

 महाराष्ट्र राज्यातील शेतकरी विविध नैसर्गिक संकटाचा तसेचसंकटांचा सामना करत आहे. आमच्याकडे जरा चांगले उत्पादन होते. तसेच आमच्या भागात फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. माझा स्वतःकडे डाळिंब आणि शेवग्याची भाग आहे त्यातून चांगले उत्पन्न मिळते. चांगल्या कामाला आपला हातभार लागावा म्हणून मी पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत असल्याची माहिती नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सातमाने गावातील पुरस्कार प्राप्त शेतकरी विनोद जाधव यांनी दिली. विनोद जाधव यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला असून त्यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील चिंचवडगाव येथील शेतकरी प्रल्हाद गवारे यांनाही कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांनी देखील पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली.

यामध्ये तिसरे शेतकरी हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर गावातील युवा शेतकरी समीर डोंबे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला. त्यांनी या पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे. सध्या पैशांची गरज ती माझ्यापेक्षा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जास्त आहे. त्यामुळे या माध्यमातून समाजात एक चांगला संदेश जावा यासाठी मी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पुरस्काराची रक्कम दिल्याची माहिती समिर डोंबे यांनी दिली.

 नाशिकमध्ये पार पडला होता हा सोहळा

 नाशिक मध्ये 2 मे रोजी कृषी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला होता व या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल भगतसिंह होशियारी हे उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. त्यांच्यासोबत कृषिमंत्री दादाजी भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील आणि नेते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:…..अखेर फिक्स झालंच! या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना 50 हजार रुपये

नक्की वाचा:खूपच छान! गुजरात मधील तरुण शेतकऱ्याने बनविला बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर, एकदा चार्ज केल्यावर चालतो दहा तास

नक्की वाचा:Health Tips: पाणी पिताना काळजी घ्या? चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे ठरू शकते आरोग्याला घातक; वाचा पाणी पिण्याची योग्य पद्धत

English Summary: three farmer in maharashtra give return award cash to chief minister fund Published on: 08 May 2022, 09:27 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters