राज्यात विधानपरिषद निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे सरकार पडणार की टिकणार अशी परिस्थिती सध्या सुरु आहे. शिंदे यांच्या सोबत मोठ्या प्रमाणावर आमदार गेले असल्याचे सांगितले जात आहे. असे असताना आता महाराष्ट्रात राजकीय संकट ओढावलेले असतानाच मागील चार दिवसात हजारो कोटी रुपयांचे सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे याची सध्या चर्चा सुरु आहे.
यामध्ये 280 सरकारी आदेश जारी करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे, यामध्ये जीआर हा प्रत्यक्षात विकासाशी संबंधित कामांसाठी तिजोरीतून निधी उपलब्ध करुन देण्याची परवानगी देणारा अनिवार्य आदेश आहे. यामुळे आता ही कामे होणार की रखडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जणू काही आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळेच की काय या पक्षामधील मंत्र्यांमध्ये आपापल्या विभागामध्ये जीआर जारी करण्याची चढाओढ सुरु आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे, तर शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री असलेले आणि सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल गुलाबराव पाटील यांच्या पाणी पुरवठा विमागाने 17 जून रोजी 84 जीआर जारी केले होते. ज्यातील बहुतांश आदेशांमध्ये निधीची मंजुरी, प्रशासकीय वेतन आणि विविध पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा समावेश आहे. त्यानंतर काँग्रेसचा समावेश होतो.
वय ७८ पण कामाचा तोच जोश आणि तोच उत्साह!! आजींकडून भात उत्पादनासाठी शेतीची मशागत
असे असताना याला भाजपने विरोध केला आहे. अल्पमतात दिसणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारकडून जारी करण्यात आलेल्या जीआरचा आढावा घेऊन त्यावर बंदी घालण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडणार हे ठरलेले आहे.
आता लाल मुंग्याची काळजी करू नका! 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
मंगळवार (21 जून) आणि बुधवार (22 जून) अशा दोन दिवसांत तब्बल 135 शासन निर्णय निघाले. यामध्ये सर्वाधिक जीआर पाणीपुरवठा आणि जलसंधारण विभागाचे आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनांना मंजुरी आणि कोल्हापुरी, सिमेंट बंधाऱ्यांच्या अंदाजपत्रकीय किंमती दीडपट करण्याचे निर्णय घेतले आहेत. एका दिवसाचे कामाचे आठ तास गृहीत धरले तर प्रत्येक नवव्या मिनिटाला एक जीआर जारी झाला आहे. यामुळे याचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
टोमॅटोने दुष्काळच हटवला! वर्षात दुहेरी उत्पादनातून शेतकऱ्याने कमवले २ कोटी ५० लाख
आता पंजाबरावांनी जुलै महिन्यांचा अंदाज केला जाहीर, वाचा कधी पडणार नेमका पाऊस
मोदींचे २ हजार मिळाले नसतील तर थेट 'या' नंबरवर फोन करून करा चौकशी, लगेच मिळतील पैसे...
Share your comments