कापूस हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. कापसाची लागवड महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. कापसाला पांढरे सोने म्हणतात.
जळगाव,धुळे आणि नाशिक जिल्ह्यांच्या काही भागाचा विचार केला तर कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु बऱ्याचदा आणि यावर्षी कपाशी पिकाला अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे कपाशीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा नक्कीच कमी होईल त्यामुळे बाजारात कपाशीचे आवक कमी राहिली तर खाजगी व्यापारी कपाशीला साडेसहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव देऊ शकतात, असे दिलासादायक चित्र सध्या आहे.
तसेच यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील कपाशीला चीन आणि बांगला देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. दुसरे म्हणजे महाराष्ट्रात यावर्षी अनेक टेक्स्टाईल पार्क सुरू झाल्याने त्याचाही परिणाम कपाशी भाव वाढीवर होईल असा एक महत्वाचा अंदाज आहे.काही ठिकाणी मे मध्ये लागवड असलेल्या कापूस थोड्या प्रमाणात बाजारात येऊ लागला आहे. अतिशय कमी प्रमाणात विक्रीला आलेल्या कपाशीला काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर दिला.
परंतु हा दर अतिशय कमी प्रमाणात विक्री झालेल्या कपाशीला होता. परंतु या वर्षी चांगल्याकपाशीला साडेसहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर राहील. एक ऑक्टोबर पर्यंत बाजारात नवीन कापूस येईल. यावर्षी महाराष्ट्रात 70 ते 75 हजार कपाशीच्या गाठी तयार होण्याचा अंदाज आहे तसेच भारतात तीन कोटी 50 लाख गाठी तयार होतील असा अंदाज आहे.
Share your comments