शेतकऱ्यांनो ऐकली का खूशखबर! यंदा १०० टक्के पाऊस पडणार - हवामान खात्याचा अंदाज

Wednesday, 15 April 2020 01:59 PM
संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र


शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा सरासरी इतका पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.  सध्या अवघा देश करोना नावाच्या संकटाशी लढतो आहे. अशात हवामान खात्याने दिलेली बातमी ही काहीशी दिलासा देणारी आहे.  ५ जून ते ३० सप्टेंबर हा पावसाचा कालावधी असेल. या कालावधीत दमदार  पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरम्यान हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामाच्या सुरुवातील एल -निनो स्थिती सर्वसामान्य राहण्याची शक्यता आहे.  नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन, हवामान विभागाचे महासंचालक एम. महापात्रा यांनी मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. दुसरा अंदाज मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात दिला जाणार आहे. यंदाचा मॉन्सून सर्वसाधरण स्वरुपाचा राहण्याच्या पूर्वुनामामुले दिलासादायक चित्र पाहण्यास मिळेल. मागील वर्षीही दमदार पाऊस पडला होता.  हवामान विभागाचा अंदाज थोडासा चुकवत वरुण राजा अधिकच बरसला होता.  जून ते सप्टेंबरदरम्यान शंभर टक्के पाऊस पडेल,  असा अंदाज हवामान विभागाने मागच्या वर्षाच्या अंदाजात म्हटले होते.

मागच्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात एकूण सरासरीच्या ११० टक्के पाऊस पडला.  मे महिन्याच्या नंतरच्या चार महिन्यातील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.  या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार ९६ टक्के अधिक-उणे चार टक्के पाऊस पडेल, असा अंदाज होता.  मात्र प्रत्यक्षात पाऊस वर्तवलेल्या अंदाजाच्या दहा टक्के अधिक झाला.  मागील वर्षी झालेला पाऊस हा १९९४ नंतरचा सर्वाधिक विक्रमी पाऊस आहे.  याआधी सन १९९४ मध्ये ११० टक्के पाऊस नोंदला गेला होता.  महाराष्ट्रातही एकूण ३२ टक्के पाऊस अतिरिक्त पडला आहे. दरम्यान हवामानात बदल होत असल्याने नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे.

India Meteorigical Department IMD Monsoon rain 100 percent rain fall in monsoon हवामान विभाग भारतीय हवामान विभाग नवी दिल्ली मॉन्सूनचा पाऊस शंभर टक्के मॉन्सून पाऊसाचा अंदाज हवामान विभागाचा अंदाज मॉन्सून
English Summary: this year 100 percent rain fall in monsoon - India Meteorigical Department

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.