1. बातम्या

'हा' व्हायरस ठरू शकतो घातक! कोंबडीतून माणसात आला 'हा' रोग, जाणुन घ्या कसा

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
hen rearing

hen rearing

कुक्कुटपालन (Hen Rearing) जगात मोठ्या प्रमाणात केले जाते आणि यातून पशुपालन करणारे शेतकरी चांगली कमाई देखील करतात, पण आता कोंबडीपासून माणसात आजार पसरतांना दिसत आहेत. अलीकडेच एक माहिती हाती आली आहे की कोंबडीपासुन एक व्हायरस पसरत आहे, ह्या व्हायरसला एवीयन फ्लू ह्या नावाने ओळखले जाते. एवीयन फ्लूचे एकूण 8 स्ट्रेन देखील आहेत.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मागच्या डिसेंबर महिन्यात रुस मध्ये अस्त्रखान ह्या शहरात मोठ्या प्रमाणात कोंबड्या मरू लागल्यात. एका मोठ्या शेतात तर म्हणे लाखो कोंबड्या मरण पावल्या. म्हणून यावर संशोधन करण्यात आले, संशोधन हे तेथील राज्य संशोधन केंद्रावर करण्यात आले, यात सामोरे आले की हा कोंबड्यामध्ये पसरणारा एक स्ट्रेन आहे, ज्याला H5N8 नावाने ओळखले जाते. हा खुप घातक एवीयन फ्लू आहे जो कोंबडीतुन माणसात पसार होऊ शकतो. म्हणुन तिथे जवळपास 9 ते 10 लाख कोंबड्या ह्या मारून टाकण्यात आल्या होत्या.

कोंबड्यातुन पसरतोय हा व्हायरस (This Virus Spread By Chickens)

एवीयन फ्लू हा कोरोनासारखाच एक रोग आहे, हा फ्लू खुप घातक आहे आणि याचा एक स्ट्रेन आहे H5N8. हा स्ट्रेन खुप खतरनाक आहे यामुळे लाखो कोंबड्या, बदकं, तसेच इतर पक्षी मुर्त्युमुखी पडत आहेत. आता रुसमधेच एक घटना समोर आली आहे, एका फार्म मधील जवळपास 150 कामगारांचे चेकअप केल्यानंतर समोर आले की यातील 5 कामगार हे या फ्लूने संक्रमित झाले. यातून हे सामोरे आले की H5N8 हा व्हायरस पक्षीमधून माणसात येऊ शकतो.

 

वर्ल्ड हेल्थ ऑरगॅनायजिशेन (World Health Organisation) ह्यावर लगेच ऍक्टिव झाले आहे आणि लवकर यावर वॅक्सीन शोधली जाईल असा दावा देखील केला आहे. हा व्हायरस घातक जरूर आहे पण भारतात अजून तरी हा रोग आल्याचे चिन्ह नाहीत. हा व्हायरस आधी देखील 2014 मध्ये आल्याचे सांगितले जाते तेव्हा याचा H5N6 हा स्ट्रेन आला होता. हा स्ट्रेन कोरोनाच्या विषाणूसारखा आपले रूप बदलत असतो म्हणजे हा व्हायरस म्यूटशन करू शकतो. म्हणून हा व्हायरस घातक असल्याचे सांगितले जात आहे.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters