1. बातम्या

खरं काय! 'या' जातीचे टोमॅटो विकले जातात तब्बल 600 रुपये किलोने, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
cherry tomato

cherry tomato

देशात सर्वत्र टोमॅटो लागवड नजरेस पडते, राज्यात देखील टोमॅटोची लागवड केली जाते. टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटो लागवडीतून चांगली कमाई देखील करत असतात. मध्यप्रदेश मध्ये देखील टोमॅटो लागवड नजरेस पडते. येथील जबल्पुर जिल्ह्यात एका विशिष्ट जातीच्या टोमॅटोची शेती केली जात आहे. या टोमॅटोचा आकार चेरी आणि द्राक्ष सारखा असतो तसेच याची मागणी देखील लक्षणीय असते. याची मागणी तर अधिक असतेच शिवाय या टोमॅटोची किंमत देखील इतर टोमॅटो पेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त असते. जबल्पुर जिल्ह्यात उगवल्या जाणाऱ्या या टोमॅटोला 600 रुपये प्रति किलो दर प्राप्त होत असतो. विशेष म्हणजे या टोमॅटोला फक्त देशातूनच मागणी असते असं नाही तर विदेशात देखील याची मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि अमेरिका व दुबई सारख्या देशात या टोमॅटोची निर्यात देखील येथील शेतकरी करत असतात.

जबलपुर मध्ये अनेक शेतकरी या खास टोमॅटोची शेती करत असतात, अंबिका पटेल हे शेतकरी देखील या टोमॅटोची लागवड करतात आणि यातून चांगली मोठी कमाई करतात. अंबिका मागील अनेक वर्षापासून या विशेष जातीच्या टोमॅटोची शेती करत आहेत. जबलपूरच्या शेतकऱ्यांसाठी या टोमॅटोची शेती विशेष लाभदायी सिद्ध होत आहे कारण की या टोमॅटोला बाजारपेठ देखील जबलपूर व मध्यप्रदेश मधील शहरातच उपलब्ध झाली आहे. अंबिका पटेल हे शेतकरी देखील या जातीच्या टोमॅटोची विक्री मध्यप्रदेश मधील मोठ्या शहरात करत आले आहेत. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की या जातीच्या टोमॅटोचे बी हे खूपच लहान असते, आणि म्हणून याची शेती करणे एक चॅलेंजिंग काम असते, या बियांची पेरणी ही ट्रे किंवा कॉकपिटमध्येच करावी लागते. तसेच या टोमॅटोसाठी पाणी व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते या टोमॅटोला पाणी ठिबक सिंचन प्रणाली द्वारे द्यावे लागते. या जातीच्या टोमॅटोला चेरी टोमॅटो म्हणून संबोधले जाते.

अंबिका पटेल यांनी जैविक पद्धतीने चेरी टोमॅटोची शेती केली. त्यांनी शेती करण्याआधी टोमॅटो शेती वर खूप रिसर्च केला रिसर्चमध्ये त्यांना चेरी टोमॅटोची त्यांच्या जमिनीसाठी उपयुक्त असल्याचे समजले आणि त्या अनुषंगाने त्यांनी चेरी टोमॅटोची लागवड केली व त्यातून यशस्वी उत्पादन देखील प्राप्त केले. अंबिका पटेल यांच्या मते या टोमॅटोला हायब्रीड टोमॅटो म्हणून देखील संबोधले जाते. हा चेरी टोमॅटो पावसाळ्यामध्ये देखील लावला जाऊ शकतो मात्र पावसाळ्यात याची लागवड पॉलिहाऊसमध्ये केली असता या पासून चांगले उत्पादन प्राप्त होते. 

जेव्हा इतर टोमॅटोची आवक मंदावते तेव्हा या टोमॅटोला विशेष मागणी असते आणि त्याला अपेक्षेपेक्षाही अधिक बाजारभाव प्राप्त होत असतो. चेरी टोमॅटो आकाराने लहान असली तरी यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स आढळतात आणि याची चव अगदी आपल्या साध्या टोमॅटो प्रमाणेच असते. या टोमॅटो ची पॅकिंगची विशेष पद्धतीने केली जाते याची पॅकिंग अगदी द्राक्षाच्या पॅकिंग प्रमाणे केली जाते. निर्यात करण्यासाठी हे टोमॅटो थोडेसे कच्चे असतानाच तोडावे लागतात. चेरी टोमॅटो दर पॉलिहाऊसमध्ये लावला गेला तर एक एकरात तब्बल 20 टनांपर्यंत उत्पादन घेतले जाऊ शकते असे चेरी टोमॅटो उगवणारे शेतकरी माहिती देतात.

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters