1. बातम्या

Humni Control: 'या'साखर कारखान्याचा हुमणी नियंत्रणासाठी विशेष मास्टर प्लान, शेतकऱ्यांना प्रतिकिलो भुंगेरेमागे मिळतील 350 रुपये

हुमनी अळी शक्ती मधील सर्वात खतरनाक आणि नुकसान करणारी कीड असून या किडीचे नियंत्रण करण्यासाठी खूप गोष्टींचे नियोजन करणे गरजेचे असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this sugercane factory making atrractive plan to control humni insect

this sugercane factory making atrractive plan to control humni insect

हुमनी अळी शक्ती मधील  सर्वात खतरनाक आणि नुकसान करणारी कीड असून या किडीचे नियंत्रण करण्यासाठी  खूप गोष्टींचे नियोजन करणे गरजेचे असते.

या किडीचा पिकांमध्ये प्रादुर्भाव झाला तर कमीत कमी पिकांचे50 ते 60 टक्‍क्‍यांच्या पुढे नुकसान होते.तसे पाहायला गेले तर ही कीड विविध प्रकारच्या पिकांमध्ये असते परंतु ऊस शेतीमध्ये देखील हुमणीचा उपद्रव खूप मोठ्या प्रमाणात असतो.

यामुळे बरेच शेतकरी  या किडीमुळे त्रस्त आहेत. तसे पाहायला गेले तर या किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपाय योजना ऐवजी एकात्मिक कीड नियंत्रण खूपच गरजेचे असते. यामध्ये ऊस पिकाचा विचार केला तर ऊस पिकाचा देखील या किडीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

या सगळ्या समस्या वर उपाय म्हणून  रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू 2022-23या हंगामामध्ये एकात्मिक कीडनियंत्रण योजनेच्या माध्यमातून हुमणीचे भुंगेरे गोळा करण्याचे धोरण राबवणार आहे. यामुळे या किडीचे नियंत्रण योग्य वेळेत करणे सोपे होईल.

यामागील सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या कारखान्याचे जे कार्यक्षेत्र आहे, त्या कार्यक्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षापासून पाण्याचा ताण, अवर्षण प्रवण स्थिती इत्यादी कारणांमुळे हुमणी किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊन उसाच्या एकरी उत्पादनांमध्ये खूप मोठी घट झालेली आहे.

तसेच एकंदरीत राज्यात सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कारखाने एक प्लान केला असून हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो.

 नेमके कसे आहे हे धोरण?

हुमनी कडीचे भुंगे वाळवा चा पाऊस पडण्याच्या नंतर मे व जून महिन्यामध्ये जमिनीतून बाहेर पडतात व कडुलिंब, बोर आणि बाभुळाच्या  झाडांवर चढतात व या वृक्षांची पाने खातात. या किडीच्या भुंग्यांनीखाल्लेले पानाचा आकार अर्धचंद्राकृती दिसतो तसेच हे भुंगेरेतपकिरी अथवा काळ्या रंगाचे असतात.

सूर्यास्तानंतर हे भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन सूर्योदयापूर्वी पुन्हा जमिनीत जातात. संध्याकाळचा सात ते आठया वेळेमध्ये ते झाडावरमोठ्या प्रमाणात जमलेले असतात. या कालावधीतच या भुंगाना गोळा करावे व रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.

हे जे सगळे काम आहे हे एक जून ते 15 जुलै2022 पर्यंतच्या कालावधी दरम्यान पूर्ण करायचे आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेऊन सहकार्य करावे.

एवढेच नाही तर या कार्यक्रमांतर्गत हुमणीचे भुंगेरे मुख्य शेतकी कार्यालयांमध्ये जमा करणाऱ्या शेतकऱ्याना कारखान्यामार्फत प्रतिकिलो भुंगेरे साडेतीनशे याप्रमाणे रक्कम देखील देण्यात येणार आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Breaking News: मान्सूनचं केरळ मध्ये झालं दणक्यात आगमन; 'या' तारखेला महाराष्ट्रात धडकणार

नक्की वाचा:Small Business Idea: गावातचं सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा लाखों; वाचा

नक्की वाचा:देशात बनावट नोटांचे प्रमाण वाढत आहे, RBI च्या अहवालात धक्कादायक माहिती समोर

English Summary: this sugercane factory making atrractive plan to control humni insect Published on: 29 May 2022, 01:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters