Pune Metro Update :- पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा उभ्या करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकल्पांच्या काम हाती घेण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे मेट्रो प्रकल्प देखील पुण्यामध्ये साकारले गेले असून नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले.
विशेष म्हणजे पुणे मेट्रोला प्रवाशांचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील मिळत आहे. याच अनुषंगाने जर आपण शिवाजीनगर ते हिजवडी दरम्यान धावणाऱ्या मेट्रोचा विचार केला तर यामध्ये आता अत्याधुनिक ब्रेक सिस्टमचा वापर करण्यात येणार आहे. एक अनोखी सिस्टम असून यामुळे ऊर्जात मोठ्या प्रमाणावर बचत होण्यास मदत होणार आहे.
काय आहे अत्याधुनिक ब्रेक सिस्टम?
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोत ब्रेक दाबले तर वीज निर्मिती होईल व याच विजेचा मेट्रो धावायला देखील उपयोग होणार आहे. हे एक अनोखे तंत्रज्ञान असून नव्याने ज्या काही मेट्रो सुरू केल्या जात आहेत त्यामध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात येते. जर आपण शिवाजीनगर ते हिंजवडी या दरम्यानचे अंतर पाहिले तर ते 23 किलोमीटरचे असून दुसऱ्या मेट्रोचे काम देखील पुण्यात वेगात सुरू आहे.
हिंजवडी या ठिकाणी आयटी हब असल्याकारणाने नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या मार्गाला प्रवाशांचा खूप मोठा प्रतिसाद मिळणार आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात पीपीपी तत्वावर हे काम सुरू आहे.
विशेष म्हणजे याकरिता स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी म्हणून पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या मेट्रोमध्ये सर्व प्रकारचे अंतिम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मेट्रोचा ब्रेक दाबल्यानंतर त्यातूनच वीज निर्मिती हा त्याचाच एक भाग असणार आहे.
या ब्रेकिंग सिस्टम मध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान जी काही मेट्रो धावेल तिच्या प्रत्येक बोगीमध्ये इलेक्ट्रिक ब्रेकिंग तसेच इलेक्ट्रो न्यूमॅटिक ब्रेकिंग अशा दोन यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. या ट्रेनच्या मोटर्स ब्रेक कम पावर जनरेटर म्हणून काम करतील. त्यामध्ये नेहमीचा जो काही मेट्रोचा वेग असेल त्याच वेगाने ट्रेनला इलेक्ट्रिक ब्रेकिंग लागू करण्यात येईल.
जेव्हा मेट्रोचा वेग ताशी दहा किलोमीटर किंवा त्यापेक्षा देखील कमी होईल त्याचवेळी इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम सुरू होईल. मेट्रोच्या प्रत्येक बोगीमध्ये दोन स्वतंत्र असे इलेक्ट्रॉनिक न्यूमॅटिक सर्किट्स देण्यात येणार आहेत. यामध्ये पहिला सर्विस सर्किट आणि दुसरे म्हणजे सहाय्यक सर्किट असणार आहे.
यातील इलेक्ट्रो न्यूमॅटिक मॉडेल एकाच वेळी काम करेल व या मॉडेलमध्ये संपूर्ण वायवीय ब्रेक सक्रियकरण उपकरणे असतील. तसेच यामध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम हे यंत्रणा असणारा असूनही ऊर्जा पुनर्प्राप्ती यंत्रणा आहे. मेट्रो ट्रेनच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा ट्रेन ब्रेक लावते तेव्हा गतीच ऊर्जा सोडली जाते आणि ती मोटर्स मधील विद्युत प्रवाहात साठवली जाते.
मेट्रो ट्रेनच्या बॅटरी मध्ये वितरित होणारी ही वीज इलेक्ट्रिक जनरेटर म्हणून देखील कार्य करते तसेच या माध्यमातून निर्माण झालेली विद्युत ऊर्जा त्याच ट्रेनला किंवा मार्गावरील इतर मेट्रो गाड्यांना देखील वापरता येऊ शकते.
Share your comments