1. बातम्या

शेतकऱ्यांना बजेटमध्ये काय मिळाले? जाणून घेऊ संक्षिप्त रूपात

अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या एम एस पी आता शेतकऱ्याच्या खात्यावर पाठवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
hon.nirmala sitaraman

hon.nirmala sitaraman

अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या एम एस पी आता शेतकऱ्याच्या खात्यावर पाठवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

 असेच चालू हंगामामध्ये जवळजवळ 163 लाख शेतकऱ्यांकडून 1208 मेट्रिक टन गहू आणि धानाची खरेदी करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन म्हणाल्या की, माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 2.37 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतीसंबंधित झालेल्या काही मोठ्या घोषणा पाहू.

 अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या शेती संबंधित काही मोठ्या घोषणा

  • शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक बनवण्यासाठी पीपीपी मोडमध्ये नवीन योजना सुरू केल्या जातील. जे शेतकरी पब्लिक सेक्टर रिसर्च शी संबंधित आहेत त्यांना याचा फायदा होईल.
  • शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्यासाठी पीपीपी मॉडेल मध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
  • झिरो बजेट शेती आणि सेंद्रिय शेती तसेच आधुनिक शेती,मूल्यवर्धन आणि व्यवस्थापन यावर भर दिला जाईल.
  • अर्थसंकल्पीय भाषणाच्या दरम्यान सीतारामन यांनी केन बेतवा नदी जोडणी प्रकल्पाची घोषणा केली. 44 हजार कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे याचा फायदा  900,000 शेतकऱ्यांना होणार आहे.
  • पिक मूल्यमापन,जमिनीच्या नोंदी, किटकनाशकांची फवारणी यासाठी शेतकरी ड्रोनचा वापर यामुळे शेतीमध्ये  तंत्रज्ञानाची लाट येण्याची अपेक्षा आहे.
  • नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नीधीची सुविधा
  • स्टार्टअप एफपीओला पाठिंबा देऊन शेतकऱ्यांना हायटेक बनवले जाईल.
  • 2023 वर्ष खाण्याचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्यात येणार आहेत.
  • ड्रोनद्वारे शेतीला प्रोत्साहन दिले जाईल शिवाय 100 गती शक्ती कार्गो टर्मिनल बांधले जातील.
  • गंगा नदीच्या पाच किमी रूंद कॉरिडॉर मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी वर लक्ष केंद्रित करू रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला देशभर चालना दिली जाईल.
English Summary: this is some major announcement for agriculture sector in budget Published on: 01 February 2022, 03:01 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters