सोलापूर जिल्हा परिषदेने नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नमामी चंद्रभागा केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत असणारा प्रकल्प राबवला असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून नदीकाठीची शेती सेंद्रिय पद्धतीने पिकवली जाणार आहे.
चंद्रभागेच्या आजूबाजूच्या शेतात रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. हा रासायनिक पदार्थाचा वापर कमी करण्यासाठी सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन व जनजागरण करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. भीमा नदीकाठच्या गावात प्रदूषण रोखण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भीमा नदीकाठच्या शेतीमध्ये होणाऱ्या रासायनिक खतांचा वापर कमी करून त्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
घनकचरा व्यवस्थानअंतर्गत पशुपालन मलमुत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प तसेच कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, गोबर गॅसबाबत जनजागृती करून नदीकाठच्या शेतकरीवर्गात जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी महिनाअखेरीस शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले माही.
पुणे जिल्ह्यातून आलेल्या भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा चंद्रभागा बोलतात. भीमा नदी माळशिरस, माढा, करमाळा व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या नऊ तालुक्यांतून वाहते. १३१ गावात प्रबोधन करण्यात येणार असून सध्या दहा गावात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
उन्हाळी सोयाबीन बियाणे प्रकरणी चौकशी करून मदत देण्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन
Share your comments