आपल्या गावात अनेक युवक असतात, ज्यांना आपल्या घराची जबबादारी घेण्यासाठी शहरात जावे लागते. पण अनेकजणांना गावात राहून काम करायची इच्छा असते. अशा युवकांसाठी हा लेख महत्त्वाचा आहे, यात गावात सुरु केल्या जाणाऱ्या व्यवसायाची माहिती देण्यात आली आहे..
फ्रोजन फ़ूड मार्ट का बिजनेस (Frozen Food Mart Business)
फ्रोजन फूड मार्ट चा व्यवसाय- भाजीपाला आणि मांस, मासे, फळे यांची शहरात मोठी मागणी असते. शिवाय गावातही भाजीपाल्याची आणि फळांची मोठी मागणी असते. पण हे सर्व पदार्थ नाशवंत असल्याने आपण अशाच पद्धतीने ठेवून शकत नाहीत. यासाठी फ्रोजन फूड मार्ट आपण सुरू केले तर आपण दोन-तीन दिवस भाजीपाला व्यवस्थित ठेवू शकतो.
बुक शॉपचा व्यवसाय (Book Shop Business)
- आपल्या गावात किंवा शहरात आपण बूक शॉप पुस्तकांचे दुकान सुरू करू शकतो. मग ते स्टेशनरी असो किंवा इतर बाकीचे पुस्तक विक्री असो, दोघांमध्ये आपणास खूप नफा असतो. याशिवाय आपण ऑनलाईन पुस्तक विकण्याची फ्रेंचाईजी ही सुरु करु शकता.
(Vehicle Repair and Parts Sales Business) वाहन विक्री आणि दुरुस्ती तसेच स्पेअर पार्ट विक्री दुकान – या व्यवसायात आपल्या भांडवलाची नासाडी होत नाही. वाहने दुरुस्त करण्याचा व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढणारा व्यवसाय आहे. यासाठी आपल्याला या कामासाठी प्रशिक्षण घ्यावे लागेल.
(Plumbing Business) नळे दुरुस्तीचे कामे - या कामांमध्येही मोठा नफा असून आपल्याला काम नेहमी असते. या कामात आपण काहीजणांना नोकरीही देऊ शकतो. या व्यवसायातून आपण ५ ते १० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
(Furniture Business) फर्निचर व्यवसाय – हे एक छोट्या आणि मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणात चालणारा व्यवसाय आहे. कमी गुंतवणुकीत आपण हा व्यवसाय सुरु करु शकतो. यासाठी आपल्याला एक दुकान म्हणजे गाळा घेण्याची गरज असेल.
Share your comments