किनगाव राजा:-सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा येथील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण जाधव यांनी सेंद्रिय पद्धतीने मिरचीची व भाजीपाला फळ उत्पादन शेती (१०गुंठे चे शेडनेट ६०×१५०) तयार करून या शेडनेटमध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न सेंद्रीय खताद्वारे भाजीपाला उत्पन्न घेऊन स्वतः लोकांच्या घरी पोहोच करत आहे. शेतकऱ्यांनपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.शेती करताना शेतकऱ्यांना अनेक असमानी संकटाना तोंड द्यावे लागते पण या संकटावर मात करत कमी जमीनमध्ये पण आपन उत्पन्न घेऊ शकतो हे एक उदाहरणं आज ज्ञानेश्वर जाधव यांनी दिले.सुरवातीला मिरची लागवड करून त्यावर कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत व केमिकल चा वापर न करता गांडूळ खत याचं वापर केला
दैनंदिन जीवनात येणाऱ्या पदार्थ दुध, ताक,हळद,गूळ, गोमूत्र ,लिंबू अरक, यांचा वापर करून मिरची, भाजीपाला, फवारणी साठी उपयोग केला.मिरची लागवड करून ६ महिन्यात त्यांनी १ लाख तर भाजीपाल्यामध्ये साठ ते सत्तर हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळवले आहे.कमी खर्च व आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा व औषधं वापर न करता सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलोकन करावा जेने करून भविष्यात रासायनिक खताचा उपयोग टाळून आपल्या जमीनीची उगम क्षमता वाढविण्यास मदत होईल व जमिनीत क्षाराचे प्रमान वाढणार नाही सेंद्रिय शेती करून जमीन भुसभुसशीत रहाते व कुठलाही दुष्परिणाम होत नाही.
सलग दोन ते तीन वर्षापासून या शेड नेट द्वारे 10 ते 20 गुंठे मध्ये नेहमीप्रमाणे चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मेहनती द्वारे होता आहे.महाराष्ट्रशासन यांच्या कडुन संत सावता माळी रयत बाजार सेंद्रिय शेती करनाऱ्या प्रगतशील शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना वाव मिळाला पाहिजे कृषी विभाग यांच्या कडून 'पिकेल ते विकेल' या स्लोगन चीविक्री करण्यासाठी छत्री देऊन गौरव करण्यात आला होता.
हजारो रुपये रासायनिक औषधी त खर्च न करता शेतकऱ्यांसमोर सध्याही शेंद्री खताद्वारे नेटमध्ये मेथीची भाजी, पालकाची भाजी, संभार, शेपूची भाजी, वालाच्या शेंगा, आंबट चुक्याची भाजी, वांगी, टमाटे, गाजर, मुळी, इत्यादी अनेक प्रकारचे फळ भाजी शेडनेट द्वारे सेंद्रिय खता च्या पद्धतीने लाखोचे उत्पन्न दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी किनगाव राजा येथील शेतकरी ज्ञानेश्वर जाधव यांनी मेहनतीने व
आपला भाजीपाला मार्केटला नविता स्वतः बाजारात व घरी घरी जाऊन विकला स्वतःची रोजगार निर्माण केले. शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण हवा असा भरघोस उत्पन्न या कमी जमिनीमध्ये घेतलेला दिसून येत आहे.
Share your comments