1. बातम्या

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्राम कृषी संजीवनी समित्याबद्दल घेतले हे निर्णय

राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करत असते जे की शेतकऱ्यांची प्रगती व्हावी म्हणून ते नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढत असते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असे निर्देश काढले आहेत की शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ग्राम कृषी संजीवनी समिती महत्वाची असून समिती लवकरात लवकर गठीत करण्यात याव्यात. विशेष म्हणजे अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, जळगाव या जिल्ह्यातील समित्या तातडीने गठीत करण्यात याव्यात तसेच तेथील ग्रामसेवक वर्गाने सचिव सदस्य होऊन स्वतः जबाबदारी स्वीकारावी व आपले कामकाज तातडीने सुरू करावे. एवढेच नाही तर अजितदादा यांनी असेही सांगितले आहे की जी ग्रामसेवकाची रिक्त पदे आहेत ती सुद्धा भरण्यात येणार आहेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Ajit Pawar

हेही वाचा:धानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट

ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करा:

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करून अंमलबजावणी करण्यासाठी जी बैठक आयोजली होती. या बैठकीत उपस्थित अधिकारी मंडळ म्हणजे अॅडवोकेट रोहिणी खडसे, ग्रामविकास विभागाचे अपरमुख्य सचिव अरविंद कुमार तसेच  नियोजन  विभागाचे अपरमुख्य सचिव देबशीष चक्रवर्ती, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संचालिका इंद्रा मालो, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास  चंद्र रस्तोगी तसेच कृषी सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा परिषद मुख्य अधिकारी तसेच महाराष्ट्र ग्रामविकास युनियनचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे, राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम तसेच पुंडलिक पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली उपस्थिती लावली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की ग्रामीण भागाच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. विशेषत बाब म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने समित्या मध्ये प्रक्रिया करावी आई सांगण्यात आलेलं आहे तसेच यवतमाळ, वाशीम, वर्धा, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर,हिंगोली, बीड, औरंगाबाद जिल्ह्यामधील ज्या राहिलेल्या समित्या आहेत त्या सुद्धा तातडीने पूर्ण करण्यास सांगितले आहे. प्रत्येक समित्या तयार करून गावातील कामे मार्गी लावण्यास सांगितले आहे.

सदस्य सचिव ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकारी वर्गाकडून त्यांच्या अडचणी उपमुख्यमंत्री यांनी जाणून घेतल्या त्यांनी सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवक वर्गाने काम करावे असे सांगितले आहे. शेतकऱ्यांसाठी थेट काम करण्याची संधी ग्रामसेवक वर्गाला मिळाली आहे त्यामुळे ग्रामसेवकांनी याची जबाबदारी घ्यावी असे आव्हान केले आहे. आपली जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडावी असे  स्पष्टपणे  उपमुख्यमंत्री यांनी  सांगितले आहे.  संपूर्ण  अडचणी ऐकून घेऊन ग्रामसेवक युनियन ने काम करण्याचे मान्य केले आहे.

English Summary: This decision was taken by Deputy Chief Minister Ajit Pawar regarding Gram Krishi Sanjeevani Samiti Published on: 03 August 2021, 08:28 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters