1. बातम्या

धानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया मध्ये फुलतोय ड्रॅगन फ्रुट

KJ Maharashtra
KJ Maharashtra
dragon fruit

dragon fruit


धान्यांचे कोठार म्हणून ओळख असणारे संपूर्ण राज्यातील एक जिल्हा म्हणजे पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्हा आहे.  येथील  शेतकरी  नवनवीन  प्रयोग करत आहेत.प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी त्यांच्या शेतीत  धान्य  शेती  करण्याऐवजी ड्रॅगन  फ्रुटची यशस्वी शेती केली आहे. भालचंद्र ठाकूर यांनी ड्रॅगन फ्रुट शेतीतून लाखो रुपयांचा नफासुध्दा कमावला आहे.

गोंदिया जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुटची लागवड:

धान्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या गोंदिया जिल्ह्याची ओळख हळूहळू बदलत चालली आहे.फक्त धान्याच्या शेतीवर अवलंबून न राहता येथील शेतकरी धान्याच्या शेतीला आता पर्याय शोधत आहेत.भालचंद्र ठाकूर हे गोंदिया तालुक्यातील माजितपुर येथील शेतकरी असून त्यानी विदेशात पिकणाऱ्या ड्रॅगन फ्रुट ची लागवड आपल्या शेतीत करून त्यातून उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.

हेही वाचा:शेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार

दहा एकरात ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग:

विदेशात पिकणाऱ्या फळांची लागवड आपल्या देशात करून त्याचे चांगले उत्पादन मिळवणे हे आपल्यासाठी तसे आव्हानात्मक असते.भालचंद्र ठाकूर हे कृषी व्यवसायिक असून ते जैविक शेतीच्या क्षेत्रातअग्रेसर आहेत. त्यांनी परदेशी फळांच्या शेतीचा प्रयोग त्यांच्या दहा एकर शेतीत केला. ते परदेशी  फळ म्हणजे ड्रॅगन फ्रुट होय. थायलंड, व्हिएतनाम किंवा श्रीलंका यांसारख्या देशात या फळांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागील तीन-चार वर्षांपासून या फळाची भारतामध्ये लागवड केली जाते. धान्याचे कोठार असणाऱ्या गोंदिया मध्ये ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती करत असल्याचे भालचंद्र ठाकुर यांनी सांगितले आहे.ड्रॅगन फ्रुट हे श्रीमंत लोकांचे फ्रुट म्हणून ओळखले जाते.गोंदिया जिल्ह्याची भाताचा कोठार म्हणून सर्वदूर ओळख असून धान पीक येथील शेतकऱ्यांचा मुख्य आहे.मात्र भालचंद्र ठाकूर हे आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग नेहमीच करत असतात.

धान पिकाला जास्त प्रमाणात पाण्याची गरज असते.त्यामुळे येथील शेतकरी कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळामध्ये सापडतो.ड्रॅगन  फ्रूट  हा  व्हिएतनाम देशाने अतिशय कमी पाणी आणि कमी कालावधीत   विकसित  केलेली  फळाची जात  आहे.त्यामुळे  कमी  पाणी  आणि कमी खर्चात ड्रॅगन  फ्रूटची  बाग  फुलते. आणि सर्वसामान्य लोकांना कमी खर्चात हे फळ खाता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे राजन ठाकूर यांनी  सांगितले आहे. थायलंड, व्हिएतनाम  किंवा श्रीलंका यांसारख्या देशात सुरू असलेली ड्रॅगन फ्रुट ची शेती आता गोंदिया सारख्या धानाच्या पट्ट्यामध्ये यशस्वी करण्यात त्यांना यश आले आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters