देशातील नागरिकांसाठी ज्याप्रकारे शासन दरबारी अनेक योजना राबविल्या जातात तसेच काही योजना विचाराधीन असतात अगदी त्याच पद्धतीने बँकिंग सेक्टर मध्ये देखील संबंधित बँकेच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. या योजनेद्वारे बँका आपल्या ग्राहकांसाठी सोयी-सुविधा पुरवीत असतात.
आपल्या ग्राहकांना कर्जाचा लाभ घेता यावा यासाठी सुविधा प्रदान करत असतात. याच पद्धतीने पंजाब नॅशनल बँकेने देखील आपल्या ग्राहकांसाठी कर्जासंदर्भात एक सुविधा प्रदान केली आहे. खरं पाहता पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. PNB ने अलीकडेच आपल्या ग्राहकांच्या फायद्यासाठी एक विशेष सुविधा सुरू केली आहे, जी ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. जर तुमचे खाते PNB बँकेत असेल तर तुम्ही लवकरच या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
अनेकदा बँकेच्या ग्राहकांना पैशांची गरज असते आणि गरजेच्या वेळी पैसे मिळत नाहीत. ग्राहकांच्या अशा समस्या सोडवण्यासाठी पीएनबीने इन्स्टा लोनची सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना गरजेच्या वेळी सुमारे 8 लाख रुपयांचे कर्ज ग्राहकांना मिळू शकते. पीएनबीचे इन्स्टा लोन मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आज आपण जाणून घेऊया.
पंजाब नॅशनल बँकेचे इन्स्टा लोन घेण्यासाठी काय करावे लागणार?
पीएनबी इन्स्टा लोन घेण्यासाठी ग्राहकांना पीएनबीच्या अधिकृत लिंकवर instaloans.pnbindia.in वर अर्ज करावा लागेल. या लिंकवर तुम्हाला कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया मिळेल. याशिवाय तुम्हाला हे कर्ज तुमच्या वैयक्तिक फोनवरूनही मिळेल. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक भरावा लागेल. यानंतर तुम्हाला कर्ज सहज मिळेल.
पंजाब नॅशनल बँकेचे इन्स्टा लोन नेमकं मिळणार कोणाला
PNB Insta Loan चे फायदे फक्त तेच ग्राहक घेऊ शकतात जे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा PSU मध्ये नोकरी करतात.
इन्स्टा लोन सहज उपलब्ध होते. यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही.
पंजाब नॅशनल बँकेकडून ही सुविधा ग्राहकांना 24 तास उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या इन्स्टा लोन अंतर्गत ग्राहकांना 8 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
विशेष म्हणजे पंजाब नॅशनल बँकेच्या या इंस्टा लोन साठी प्रक्रिया शुल्क नाही.
इन्स्टा लोनद्वारे ग्राहक दोन प्रकारचे कर्ज घेऊ शकतात, ते म्हणजे वैयक्तिक कर्ज आणि ई-मुद्रा कर्ज.
महत्वाच्या बातम्या:-
अहमदनगरच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! जिल्हा बँकेने कर्जाची मर्यादा वाढवली; आता मिळणार एवढे कर्ज
मानलं भावा! 'या' अवलिया शेतकऱ्याने उसात घेतले कलिंगडचे आंतरपीक; आंतरपिकातून कमवतोय लाखों
Share your comments