1. यशोगाथा

मानलं भावा! 'या' अवलिया शेतकऱ्याने उसात घेतले कलिंगडचे आंतरपीक; आंतरपिकातून कमवतोय लाखों

शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केले तर चांगले उत्पादन मिळवले जाऊ शकते. शेतीमध्ये पारंपारिक पद्धतीने जर शेती केली तर उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल होणार आहे. यामुळे पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आहे. जालना जिल्ह्यातही एका नवयुवक शेतकऱ्याने पारंपरिक शेती पद्धतीला फाटा दिला आणि आता आधुनिक पद्धतीने शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न कमी होत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
the farmer earn from intercropping

the farmer earn from intercropping

शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केले तर चांगले उत्पादन मिळवले जाऊ शकते. शेतीमध्ये पारंपारिक पद्धतीने जर शेती केली तर उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल होणार आहे. यामुळे पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आहे. जालना जिल्ह्यातही एका नवयुवक शेतकऱ्याने पारंपरिक शेती पद्धतीला फाटा दिला आणि आता आधुनिक पद्धतीने शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न कमी होत आहे

हा नवयुवक शेतकरी शेतीमध्ये नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करीत आला आहे. शेतीमध्ये विकासाचा नवा मार्ग चोखाळत या नवयुवक शेतकऱ्याने कलिंगड पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि कलिंगड शेती यशस्वी करून दाखवली. जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्याच्या या नवयुवक शेतकऱ्याने जवळपास सहा एकर क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड केली आणि यातून तब्बल आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. योग्य नियोजन केले तर शेतीमध्येही लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले जाऊ शकते हे या अवलियाने सिद्ध करून दाखवले.

घनसांगवी तालुक्याच्या मौजे राहेरा येथील नवयुवक शेतकरी योगेश कोरडे या शेतकऱ्याने पारंपारिक पीक पद्धतीला बगल देत नगदी पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. या अवलिया शेतकऱ्याने शेतीमध्ये केलेला हा प्रयोग यशस्वी झाला असून आता योगेश गेल्या दोन वर्षांपासून कलिंगड पिकातून बक्कळ पैसा कमवीत आहेत.

योगेश यांना पारंपारिक पद्धतीत बदल करावासा वाटला आणि त्यांनी यामध्ये बदल करीत दोन महिन्यात काढण्यासाठी येणाऱ्या कलिंगड पिकाची लागवड केली. कलिंगडच्या पिकातून त्यांनी यशस्वी उत्पन्न मिळवले आणि यामुळे त्यांना आर्थिक सुबत्ता मिळाली. विशेष म्हणजे त्यांनी कलिंगडची लागवड उसाच्या पिकात आंतरपीक म्हणून केली. यामुळे जर नियोजन बद्ध पद्धतीने शेती केली गेली तर आंतरपीक देखील लाखो रुपयांचे उत्पन्न देऊ शकते हे योगेश यांनी दाखवून दिले.

योगेश यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या दोन तीन मित्रांच्या सहाय्याने उसाच्या फडात आंतरपीक म्हणून कलिंगड लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गावात व परिसरात अद्यापही शेतकरी बांधव पारंपारिक पीक पद्धतीचा अवलंब करून शेती करीत आहेत.

मात्र योगेश यांनी शेतीमध्ये वेगळा मार्ग चोखाळला आणि आज ते सक्सेसफुल ठरले आहेत. त्यांनी टरबूज शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिरेक टाळण्याचा प्रयत्न केला आणि सेंद्रिय खताला विशेष प्राधान्य दिले.

यामुळे त्यांच्या उत्पादनात भर पडली असल्याचा दावा आहे. त्यांनी मॅक्स जातीचे सहा एकर क्षेत्रात कलिंगड आंतरपीक म्हणून लावले. कलिंगडच्या या जातीला चांगली मधुर चव असल्याने बाजारात मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते. यामुळे योगेश यांना कलिंगड विक्रीसाठी जास्त परिश्रम घ्यावे लागले नाहीत व्यापारी थेट बांधावर येऊन कलिंगड खरेदी करून घेऊन गेले.

संबंधित बातम्या:-

8 वी पास महिला शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीतून कमवित आहे लाखो रुपये; ग्रामीण महिलांसाठी बनली एक प्रेरणास्रोत

बापरे! एका आंब्याची किंमत पावणे तीन लाख रुपये; आंब्याला दिली जातेय हायटेक सेक्युरिटी

नोकरीच टेन्शन हवेतच विरणार!! शेतकरी पुत्रांनो 'हा' व्यवसाय बनवेल तुम्हाला सधन

English Summary: The farmer intercrops Kalingad in sugarcane; Millions earned from intercropping Published on: 31 March 2022, 06:04 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters