उद्यापासून ३० रेल्वे होणार सुरू ; दिल्लीहून १५ शहरे जोडणार

Monday, 11 May 2020 11:10 AM


महाराष्ट्रासह ९ राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. या राज्यातील रुग्णवाढीचा वेग राष्ट्रीय दरापेक्षा जास्त झाला आहे.  केंद्र सरकारनुसार, देशात कोरोनाचे दुप्पट रुग्ण होण्यासाठी १२ दिवस लागले. अन्य संस्था १० ते ११ दिवस मानतात. सरकारी डेटानुसार, ९ राज्यांतील वेग राष्ट्रीय दरापेक्षा जास्त आहे. दरम्यान या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे देशातील सर्व सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली होती. आतापर्यंत देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही  ६७ हजार झाली आहे. दरम्यान या संकटात एक आनंदाची बातमी समोर आली आहे, सरकार उद्यापासून रेल्वे सेवा सुरु करणार आहे. याविषयीची बातमी दिव्य मराठी या वेबपोर्टलवरती देण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे देशभर अडकून पडलेल्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. उद्यापासून म्हणजेच १२ मेपासून टप्प्या टप्प्याने रेल्वे सेवा सुरू होणार आहे.  मंगळवारी विशेष सुविधेनुसार ३० राजधानी रेल्वे (१५ जोडी) सुरू होतील. आरक्षण आज सायंकाळी ४ पासून केवळ आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सुरू होईल. रेल्वे स्टेशन्सवर प्लॅटफॉर्म तिकिटासह सर्व बुकिंग काऊंटर बंद असतील. या रेल्वेत पँट्री असणार नाही. पॅक भोजन मिळेल. दिल्लीहून दिब्रुगड, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवानंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावीसाठी या रेल्वे असतील. रेल्वेच्या सूत्रांनुसार, कोरोना केअर सेंटरसाठी २० हजार बोगी राखीव आहेत. याशिवाय प्रवासी मजुरांसाठी रोज सुरू असलेल्या ३०० रेल्वे यापुढेही चालू राहतील. यानंतर उरलेल्या बोगींचा अंदाज घेऊन देशभर विशेष रेल्वेे चालवल्या जाणार आहेत.

thirty trains will start from tomorrow corona virus lockdown railway transport रेल्वे वाहतूक होणार सुरू रेल्वे वाहतूक कोरोना व्हायरस कोविड-19
English Summary: thirty trains will start from tomorrow , 15 city will connect

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.