पिक विमा कंपनी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनास तुपकरांची भेट.
शेतकर्याच्या संयमाचा अंत पाहु नका रविकांत तुपकरांचा आक्रमक इशारा
चिखली तालुक्यातील स्वाभिमानीच्या वेळोवेळी आंदोलनात्मक भुमिकेनंतर शासनाकडुन जिल्ह्यासाठी पिक विमा मंजुर करण्यात आला हजारो शेतकर्याना पिक विमा मिळाला परंतु विमा कंपनीने हुशारी करत अनेकांच्या खात्यावर कमी रक्कम दिली तर काहिंनी सोयाबीन,तुरीचा विमा काढला असतांना एकाच तुर पिकाची कमी रक्कम दिली, काहिंच्या खात्यावर अजुनही रक्कम दिली नाही,नदिकाठच्या शेतकर्याचे मोठे नुकसान झाले असतांना तोकडी मदत देण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांच्यासह सतिष सुरडकर,प्रल्हाद देव्हडे, रामेश्वर चिकणे,आशु जमदार यांच्या समवेत आदिंनी
चिखली कृषी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.तर या आंदोलनास स्वाभिमानी चे नेते रविकांत तुपकर यांनी दि15जानेवारी रोजी सकाळीच भेट दिली प्रमुख मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अन्यथा शेतकर्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे म्हणत शेतकर्याच्या संयमाचा अंत पाहु नका असा सज्जड इशारा तुपकरांनी बोलतांना प्रशासनास दिला आहे.
तालुक्यातील शेतकर्याचे अतिवृष्टिमुळे मोठे नुकसान झाले आहे.नदिकाठच्या शेत जमीनी पिकांसह खरडुन गेल्या आहेत.यांचे संयुक्त पंचनामे सुद्धा करण्यात आले आहे.जिल्ह्यातील ज्या शेतकर्यानी विमा काढला त्यांच्यासाठी शासना ने विमा देखील मंजुर केला हजारोच्या खात्यावर विमा रक्कम मिळाली;परंतु आजही तालुक्यातील अनेक शेतकरी विम्यापासुन वंचीत असल्याने व वेळोवेळी केलेल्या मागण्यांची दखल कृषी विभाग व कंपनीकडुन न घेतल्याने
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन दि१३जानेवारी पासुन पिक विमा कंपनी विरोधात चिखली कृषी कार्यालयासमोर शेतकर्यासह बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.तर पिक विमा रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी,ज्या शेतकर्याना पिक विमा कमी दिला त्यांची उर्वरीत रक्कम जमा करण्यात यावी,नदिकाठच्या शेतकर्याना नुकसान झाले असतांना कमी रक्कम खात्यावर जमा केल्याप्रकरणी चौकशी करुण उर्वरीत रक्कम तातडीने अदा करावी,दोन पिकांचा विमा काढला असतांना तुरीचाच जमा कल्याने इतर पिकाची विमा रक्कम अदा करा,शेतकर्याच्या सर्व तक्रारीचा निपटारा करण्यात यावा,यादीमध्ये पैसे पेड;परंतु प्रत्यक्षात पैसे प्राप्त नसलेल्यांचे पैसे अदा करा,या प्रकरणातील भ्रष्टाचाराची चौकशी करुन कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावा,यासह विविध मागण्या आंदोलनात करण्यात आल्या आहेत.परंतु आंदोलनाचा तिसरा दिवस उलटुनही प्रशासनाने ठोस पावले न उचलण्यात आल्याने आज स्वाभिमानी चे नेते रविकांत तुपकर यांनी
आंदोलनकर्ते यांची सकाळीच भेट घेतली तर दोन दिवसाचा अल्टिमेटम देत शेतकर्याच्या संयमाचा अंत पाहु नका अन्यथा तिव्र आंदोलन छेडु असा इशारा रविकांत तूपकर यांनी भेटि दरम्याण दिला आहे.या आंदोलनात विनायक सरनाईक,सतिष सुरडकर, प्रल्हाद देव्हडे, रामेश्वर चिकणे आदी सहभागी असुन असंख्य शेतकरी भेटि देत कंपनी विरोधात तक्रारी नोंदवत आहेत यावेळी गजानन कुटे,सचिन कुटे,संदिप जाधव,शेनफडराव पाटिल,शिवाजी देव्हडे,पदमाकर भुतेकर,अमोल तिडके,सतिष जगताप,विलास धनवे,यांच्यासह आदि शेतकरी उपस्थीत होते
Share your comments